राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी अमोल चव्हाण यांची नियुक्ती
_अमोल चव्हाण यांच्या निवडीचे बीड जिल्ह्यातून स्वागत_

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (वार्ताहर)
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी अमोल सत्यनारायण चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चव्हाण यांच्या निवडीचे बीड जिल्ह्यातून स्वागत करण्यात येत आहे.
देशाचे ज्येष्ठ नेते खा.शरदचंद्र पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अमोल चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या पक्षात जाहीर प्रवेश केला केला होता. त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांनी खासदार बजरंगबप्पा सोनवणे यांच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेतली. तरूणांना संघटित करून पक्षाची ताकद वाढवली. त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड केली. बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे, माजी आरोग्यमंत्री आ.राजेश टोपे, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, जिल्हाध्यक्ष आ.संदीप भैय्या क्षीरसागर या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देवून अमोल सत्यनारायण चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडी बीड जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. निवडीबद्दल मार्गदर्शक तथा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव गित्ते, पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, बीड लोकसभेचे माजी खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील या प्रमुख नेत्यांनी त्यांचे सहर्ष स्वागत व अभिनंदन केले आहे. आपल्या निवडीबद्दल बोलताना अमोल चव्हाण यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील साहेब यांच्या मान्यतेने, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, मेहबूबजी शेख यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे, माजी आरोग्यमंत्री आ.राजेशजी टोपे, खासदार अमोलजी कोल्हे, जिल्हाध्यक्ष आ.संदीपभैय्या क्षीरसागर या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देवून माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडी बीड जिल्हा अध्यक्षपदाची जी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ती मी अत्यंत जबाबदारीने आणि निष्ठेने पार पाडीन. तसेच आदरणीय लोकनेते खा.पवार साहेबांचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. आगामी काळात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन करणार आहे. माझ्या निवडीबद्दल स्वागत अभिनंदन करून आशिर्वादरूपी भक्कम पाठबळ देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो असे युवा नेते अमोल चव्हाण म्हणाले.
*कुशल संघटक व अभ्यासू नेतृत्व :*
अमोल सत्यनारायण चव्हाण यांनी यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून अतिशय प्रभावी काम केले आहे. त्यांच्या आई या नांदगावच्या उपसरपंच आहेत. तसेच ते यशस्वी उद्योजक ही आहेत. ते त्यांच्या सहकाऱ्यांसह मागील काही वर्षांपासून परळी व केज मतदारसंघात सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांनी शेतकर्यांच्या बाबतीत संवेदनशीलता जोपासत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचे सांत्वन केले. या कुटुंबांना सर्वोतोपरी सहकार्य केले आहे. पीक विमा लागू करून देण्यासाठी तसेच शासनस्तरावर पीक विम्यासह विविध शासकीय योजना, अनुदान, मदतीचा लाभ मिळवून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात त्या अनुषंगाने त्यांना शिक्षणासाठी वेळोवेळी आर्थिक सहकार्य ही केले आहे. जेष्ठ नागरिकांना वृध्दापकाळ मानधन योजना, निराधारांना मदत योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अनेकदा रास्ता रोको आंदोलन केले आहे. वेळोवेळी शासन व प्रशासनास निवेदने देऊन लोकहिताच्या मागण्या मान्य करून घेतल्या आहेत, तसेच त्यांनी सामाजिक दायित्व निभावताना नांदगाव आणि परीसरातील सर्वसामान्य लोकांसाठी तसेच गावकऱ्यांसाठी शासकीय किंवा खाजगी दवाखाना असो नाही. तर पोलिस स्टेशन, महावितरण कंपनीकडून डी.पी.मिळविणे, शेतकरी पिक विमा, सोयाबीन अनुदान, अळीच्या प्रादुर्भावाचे अनुदान, निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान व त्याची भरपाई, मावेजा मिळवून देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे वेळोवेळी दिलेल्या निवेदनातून मागण्या केलेल्या आहेत. गरजूंना विविध मूलभूत योजना पुरविण्यासाठी तसेच त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी त्यांच्याकडून पुढाकार घेण्यात आलेला आहे. सर्वसामान्य व बहुजन घटकांना न्याय देण्यासाठी व जात-पात, साम-दाम-दंड-भेद या राजकारणाचा अंत करण्यासाठी ते प्रत्येक निवडणुकीत जनजागृती करतात, समाजातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब बहुजन वंचित जनतेला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार हा पक्ष कटिबद्ध आहे, याच विचाराने आज चव्हाण व त्यांचे सहकारी आदरणीय खा.पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहेत. चव्हाण यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे व चव्हाण यांच्यासारख्या तरूणांमुळे ग्रामीण भागात पक्षाची ताकद वाढली आहे. ते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे दिसून आले आहे. एक कुशल संघटक व अभ्यासू नेतृत्व म्हणून अमोल चव्हाण हे समाजातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, सर्वसामान्य, वंचित व बहुजन घटकांना यापुढे ही न्याय देतील असा विश्वास बीड जिल्ह्याच्या विविध क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
*▪️विधानसभेत ही चमत्कार घडेल :*
बीड हा कायमच पवार साहेबांना मानणारा जिल्हा आहे. साहेबांनी नेहमीच जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, सर्वसामान्य, वंचित व बहुजन घटकांना न्याय दिले आहे, पुरोगामी विचार जोपासणारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार हा पक्ष भारतीय लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी कटिबद्ध आहे, याच विचाराने आज आम्ही आदरणीय खा.पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहोत, लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत ही प्रामाणिक जनताच आता फुटीर नेत्यांना घरी बसवणार आहे. विधानसभा निवडणूक देखील महाविकास आघाडी मोठ्या ताकदीने लढेल व जिंकेल. जिल्ह्यात विकासाचा मोठा अनुशेष आहे. कायम राजकारणात आम्हीच राहिले पाहिजे, असा काही लोकांचा मतप्रवाह बनला आहे. तो चुकीचा आहे. त्यामुळेच वंचित बहुजन समाज आज राजकारणातून हद्दपार होत चालला आहे. म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत सामान्य जनता पुन्हा एकदा परिवर्तन करेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
*- अमोल चव्हाण (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार)*