श्री राम मंदिर आवसगावच्या सभा मंडपाचा भुमिपुजन सोहळा आमदार नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते संपन्न
50 लक्ष रुपयांच्या सभा मंडपाने श्रीराम मंदिराच्या वैभवात पडणार भर

केज प्रतिनिधी
केज तालुक्यातील आवसगाव येथे दि. 13/8/2024 रोजी आवसगाव येथील जागृत देवस्थान श्री रामदास स्वामी राम मंदिराच्या 50 लक्ष रुपयांच्या भरीव निधीतुन सभामंडपाचा व गावांतर्गत विविध भुमपुजन विकासकामांचा भुमिपुजनाचा सोहळा केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यात सावळेश्वर ते आवसगाव रस्ता 5 कोटी , राम मंदिर सभामंडप 50 लक्ष , आवसगाव ते बनसारोळा 80 लाख रुपये या कामांचा समावेश असुन सर्व कामे दर्जेदार करुन घ्यावीत व जे गुत्तेदार सदरील कामे करत आहेत त्यांनीही चांगल्या प्रतीचे कामे पूर्ण करावीत तसेच गावातील विविध प्रश्नांसाठी आम्ही सदैव कटिबध्द राहु आसे मनोगत व्यक्त करतांना उपस्थितांना सांगितले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच विश्वास शिनगारे तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच बाबा साखरे यांनी व्यक्त केले
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी , पंचायत समिती सभापती जेष्ठ नेते नेताजी शिंदे , व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जेष्ठ नेते महादेव सुर्यवंशी , युवा नेते संतोष जाधव , जेष्ठ नेते पंडीत सावंत , युवा नेते शरद इंगळे , बोरी सावरगावचे सरपंच वैजनाथ देशमुख , बनसारोळा तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब जाधव , बांधकाम विभाग अधिकारी केज हे होते तर उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळा श्री गणेश मंदिर येथे गावकरी बांधवांच्या वतीने करण्यात आला .
गावचे भुमिपुत्र चि. रामराजे गोवर्धन साखरे यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल आमदारांनी सत्कार करुन दिल्या शुभेच्छा व गावातील तरुणांनी विविध पदांवर आपले यश रामराजे यांच्याप्रमाणे खेचून आणावे व आपल्या गावाचे व आईवडीलांचे नाव यशस्वी करावे असे आवाहन उपस्थितांना केले . सदरील कार्यक्रमास गावातील सर्व नागरिकांची विशेष उपस्थिती होती व सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला .