राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार केज तालुका कोषाध्यक्षपदी श्री राजेभाऊ शिनगारे यांची निवड
आवसगावच्या सामाजिक , राजकीय कृषी , क्षेत्रात आवड असणाऱ्या युवा नेतृत्वास मिळाली योग्य संधी

केज प्रतिनिधी
केज दि.19/8/2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.श्री जयंतराव पाटील , यांच्या मान्यतेने आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोषाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत आहे व खा .श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्व सामान्यांच्या विकासात आपण भरीव कार्य करला व पक्ष संघटना मजबूतीने उभी कराला हि अपेक्षा व आपल्या निवडीबद्दल आपले अभिनंदनाचे निवड पत्र पक्षाचे केज विधानसभा अध्यक्ष श्री सुरेश तात्या पाटील , केज विधानसभा मतदारसंघ मा.आ. पृथ्वीराज साठे , केज , केज तालुका अध्यक्ष श्री शंकर जाधव व केज विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख श्री युवराज मगर यांच्या विशेष उपस्थितीत मौजे आवसगावचे धडाडीचे कार्यकर्ते ज्यांना मुळातच सामाजिक , राजकीय , कृषी क्षेत्रात विशेष आवड असणारे व पंचक्रोशीतील सर्वांना सुपरिचित असलेले व्यक्तिमत्त्व श्री राजेभाऊ बजरंग शिनगारे यांची पक्षाच्या केज तालुका कोषाध्यक्षपदी उपस्थित पक्षाचे वरील सर्व वरिष्ठ मान्यवर यांच्या शुभहस्ते निवड पत्र देऊन निवड करण्यात आली असून सदरील निवडीचे माहिती प्राप्त होताच श्री राजेभाऊ शिनगारे यांना मानणारे मित्र मंडळ यांनी निवडी प्रसंगी आनंद व्यक्त करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
तसेच निवडी प्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकारी श्री राजेभाऊ शिनगारे यांनी पक्षाचे काम जोमाने वाढवून परिसरात घरोघरी आपल्या पक्षाचे ध्येय धोरणे पोहचण्यासाठी कटीबद्ध राहिलं आसे सांगितले . यावेळी मौजे आवसगाव येथील बहुसंख्य जेष्ठ नागरिक , युवक यावेळी उपस्थित होते .