शांतता जनजागृती रॅलीस लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा :- शिवाजी दादा ठोंबरे

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
सामाजिक विशेष
केज/प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील हे आपल्या प्राणाची बाजी लावत आहेत.मात्र सरकार सगेसोयरे कायदाची अंमलबजावणी करत नसून मराठा आरक्षणावर कुठलाही ठोस निर्णय घेत नाहीत.
सरकारला इशारा म्हणून मनोज दादा जरांगे पाटील यांनी बीड येथे 11 जुलै रोजी मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे आयोजन केले आहे.या शांतता रॅलीस बीड जिल्ह्यातील मराठा बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यांनी केले आहे. आपल्या लेकरांच्या न्याय हक्कासाठी दि. ११ जुलै २०२४ रोजी बीड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील आमरण उपोषणकर्ते, साखळी उपोषणकर्ते, मराठा सेवक, स्वयंसेवक, सभा आयोजक नियोजक, डॉक्टर, वकील, अभ्यासक, शेतकरी, कष्टकरी आणि सर्व मराठा बांधव, मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली मध्ये लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवाजी दादा ठोंबरे यांनी केले आहे.