आजारपणाच्या सह-अनुभवा नंतर बंधुत्वाच्या नात्याचा ऊर्जावान अनुभव. – प्रसाद दादा चिक्क्षे ज्ञानप्रबोधिनी अंबाजोगाई
सामाजिक विशेष लेख

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
विशेष संपादकीय
म
मागचा आठवडा आजारपणात गेला. वस्तीवरील छोट्या मोठ्यांना व्हायरलने ग्रासले होते. ताप,अंगदुखी,खोकला आणि प्रचंड थकवा. नियमित वस्तीवर जाण्याने मी पण वस्तीवाला झालो होतो. त्यामुळे मी पण चांगलाच आजारी पडलो. दररोज मुलांचे फोन होते. औषध घेतले का ? दवाखान्यात गेलात का ? तुळशी आद्रकाची चहा घ्या ? जेवण नीट करा. मी जे गेले काही दिवस त्यांना सांगत होतो ते आता मला ते सांगत होते. आजारपणाचा एकसारखा अनुभव आम्ही सगळे अनुभवत होतो. त्यातून बंधुत्व अधिकच घट्ट होत असावे.
आज राखी पौर्णिमा काल पासूनच मुलींची फोन यायला सुरुवात झाली.त्यांना आज चांगला बरा हवा होतो आणि तसा मी झालो पण होतो. आम्हा ज्ञान प्रबोधिनी अंबाजोगाईच्या परिवारासाठी राखी पौर्णिमा महत्वाचा दिवस.तसेच ज्ञान प्रबोधिनीच्या आद्य संचालकांचा आज स्मृती दिन. वस्तीवर सहसा सर्व माता भगिनी अगदीच 3 वर्षांच्या पासून 70 वर्षांच्या पर्यंतच्या मला राखी बांधतात. सर्व मुलांना राखी बांधणे राहून जाते. आज मात्र निवेदिता गटाच्या रुपालीताई मुक्कदम आणि त्यांचे यजमान श्री मिलिंद मुक्कदम व MIT शाळेतील मुलं वस्तीवरील सर्व मुलांना राखी बांधायला आलेली. सोबत मस्त अशी बुंदीची लाडू.वस्तीवर एकदम उत्साहाचे वातावरण होते. आजारपणाच्या सह-अनुभवानंतर बंधुत्वाच्या नात्याचा ऊर्जावान अनुभव घेतला.