अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे तातडीने करा
खा.बजरंग सोनवणे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कृषी विशेष
बीड/ प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी.आशा मागणीचे निवेदन खा.बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
बीड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून पाटोदा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा,उडीद,सोयाबीन पिकांबरोबर इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.परिणामी शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन घ्यावेत. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्याकरिता योग्य ती कारवाई करावी.अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केली निवेदनातून आहे. सदरील नुकसानीचे पंचनामे करत असताना एकही शेतकरी वगळून राहता कामा नये याची दक्षता घ्यावी.शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात आपण व्यक्तिशः लक्ष देऊन आहोत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला तातडीने पंचनामे पूर्ण करून घेण्याच्या सूचना द्याव्यात.जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळणे शक्य होईल. पाटोदा तहसीलदार यांनी नुकसानीचे पंचनामे करत असताना विशेष लक्ष देऊन पंचनामे करून घ्यावेत. अशा सूचना खा. बजरंग सोनवणे यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनातून दिल्या आहेत.