पिक विमा, सरसकट कर्ज माफीसाठी संभाजी ब्रिगेडचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण
कृषी विशेष

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
सन २०२३ चा प्रधानमंत्री पिक विमा मंजूर करून तो सरसकट देण्यात यावा, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा, ई-पिक पाहणी अट रद्द करा आणि सन २०२० चा पिक विमा द्यावा या मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार, दिनांक २७ ऑगस्ट रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपजिल्हाधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांना यापूर्वी निवेदन देण्यात आले होते. मागील अनेक महिन्यांपासून संभाजी ब्रिगेडने हा विषय लावून धरला आहे. पाठपुरावा सुरू ठेवला आहे. प्रमुख मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार, दिनांक २७ ऑगस्ट रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांच्या पुढाकाराने सदरील विषयांकीत प्रश्नासंदर्भात उपोषण स्थळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे, तालुका कृषी अधिकारी एस.के.ढाकणे, मंडळ कृषी अधिकारी बी.एस.सूर्यवंशी, कृषी सहाय्यक पंडित काकडे आणि पिक विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी अनिकेत पोटभरे, रविंद्र सावंत, रमेश गडदे यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. लवकरच राज्याच्या कृषीमंत्र्यांची भेट घेऊन या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना यांचे शिष्टमंडळ तसेच विमा कंपनी आणि कृषि विभाग यांचे अधिकारी यावेळी उपस्थित असतील असे आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता झाली. तत्पूर्वी संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना १६ ऑगस्ट रोजी तर तालुका कृषी अधिकारी यांना २० ऑगस्ट रोजी निवेदन दिले आहे. निवेदनातील मागण्या अशा की, १) सन – २०२३ मध्ये सोयाबीनचे १०० टक्के नुकसान झाले आहे. म्हणून शासनाने शेतकऱ्यांना १०० टक्के पिक विमा द्यावा., २) महाराष्ट्रातील शेतकरी यांचे सरसकट कर्ज माफ करावे., ३) सध्या सोयाबीन व कापूस या पिकांना हेक्टरी ५ हजार रूपये अनुदान आले आहे. परंतु, ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी केली नाही. त्या शेतकऱ्यांचे नांव अनुदान यादीत नाही. तरी त्या शेतकऱ्यांकरिता शासनाने ई-पिक पाहणी अट रद्द करावी. तसेच ४) सन २०२० चा पिक विमा द्यावा. आमच्या या मागण्या लवकर नाही मान्य केल्या तर आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करू याची नोंद घ्यावी असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अश्विनीताई यादव, तालुकाध्यक्षा सुनंदाताई लोखंडे, संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष अरूण पवार, जिल्हा सचिव नारायण मुळे, तालुकाध्यक्ष सिद्राम यादव, शहरसचिव प्रेम कांबळे, कार्यकर्ते अंगद कांबळे, अभिषेक माने, पृथ्वीराज सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. संभाजी ब्रिगेडच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, जिल्हाध्यक्ष अनुरथ काशिद, मराठा सेवा संघाचे मा.जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के, रामराजे शिंदे, दत्ता साखरे, रोहन कुलकर्णी, सतिश कुंडगिर, केशव टेहरे, परमेश्वर मिसाळ, शिवाजी जगताप, विलास जाधव, बब्रुवान सोळंके, पांडुरंग तट, सुभाष मायकर, गोविंद जामदार, महादेव जामदार, दत्तात्रय मुळे, वशिष्ठ वानखेडे, हनुमंत काळे या तालुक्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.