राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त मौजे आवसगाव येथे १२ जानेवारी रोजी अनांथांच्या आई मिराताई कदम यांच्या व्याख्यानाचे आयोजन
राष्ट्रमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्काराने होणार विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

समृद्ध महाराष्ट्राच्या सर्वांगीण बातम्यांसाठी..
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
केज तालुका प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे आवसगाव येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आवसगाव व जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ आवसगाव या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या राजमाता जिजाऊ जयंती सोहळा कार्यक्रम मा श्रीमती मालतीताई वाव्हळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ज्यांना मराठवाड्याच्या सिंधुताई सपकाळ म्हणून ज्यांना संबोधले जाते अशा साथ फाउंडेशनच्या माध्यमातून हिंगोली येथे 70 अनाथ मुलांचा सांभाळ करत शिक्षिका म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेत ज्ञानदानाचे काम करत असलेल्या अनाथांच्या आई मा.श्री . मिराताई धनराज कदम यांचे प्रेरणादायी व्याख्यान रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी ठिक 9.00 वाजता होणार आहे पंचक्रोशीतील सर्व समाज बांधवांनी व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .
स्मृतीशेष आदर्श शिक्षिका संस्थापिका स्व.श्रीमती मिराताई गोविंद शिनगारे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा व पुरस्कार समारंभ – 2025
राष्ट्रमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्काराने होणार विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव व माता भगिनींनीचा हळदी- कुंकू समारंभाचे आयोजन
राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आवसगाव ता.केज जि बीड (महाराष्ट्र) या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा गौरव राष्ट्रमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते याप्रमाणे याहीवर्षी सामाजिक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असुन यात राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार श्रीमती मिराताई धनराज कदम साथ फाउंडेशन , राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार प्रशासकीय सेवेतील कार्याबद्दल श्रीमती मालतीताई शेषराव वाव्हळे , सामाजिक कार्य मा. रविंद्र देवरवाडे श्रमिक ग्रुप देवळा तसेच शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल ज्यांनी जिजाऊ माँसाहेबाची प्रेरणा घेऊन राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची स्थापना मौजे आवसगाव येथे करून सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला व तसेच शैक्षणिक क्षेत्रात शिक्षिका म्हणून आदर्श निर्माण करुन शैक्षणिक क्षेत्रात आपले नाव कमावले अशा कुशल व्यक्तीमत्व आदर्श शिक्षिका स्व. श्रीमती मिराताई गोविंद शिनगारे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्काराचा गाडा अविरत चालू ठेवुन
त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांच्या विचारांशी सदैश कटिबध्द राहण्याचा निर्णय घेत शैक्षणिक क्षेत्रात आदर्श शिक्षक पुरस्कार मौजे आवसगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षकवृंद यात मा. श्री शामसुंदर हांडीबाग सर , मा. श्री. महेश महाजन सर , मा.श्री. ज्ञानेश्वर घोगरे सर , श्रीमती ज्योती साठे मॅडम , मा. श्री शंकर मुळे सर , मा.श्री अशोक नरवटे सर , मा . श्री धनराज धिमधिमे सर यांना तर जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आवसगाव येथील मा. श्री रमेश गव्हाणे सर , मा.श्री . संजय शिंदे सर , व ट्रेनी शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रीमती शुभांगी अभंग मॅडम व श्रीमती सुलभा शितोळे मॅडम या शिक्षण क्षेत्रातील शैक्षणिक कार्याबद्दल राष्ट्रमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे सदरील कार्यक्रमाच्या ठिकाणी मकर संक्रांतीच्या निमित्ताने उपस्थित माता भगिनींचा भव्य दिव्य असा हळदी – कुंकू व वाण वाटप कार्यक्रम होणार आहे तरी सर्व माता भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे तरी संपन्न होणाऱ्या विशेष कार्यक्रमास आपण उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मुख्य आयोजक राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आवसगाव व जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ आवसगाव या सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.