मनेश गोरे यांना आदर्श क्रिडा शिक्षक पुरस्कार जाहीर
राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक पुरस्काराने होणार सन्मान

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
शैक्षणिक क्षेत्रातील विशेष सन्मान 2024
केज प्रतिनिधी
केज तालुक्यातील बनसारोळा येथील बनेश्वर शिक्षण संस्था संचलित महाराष्ट्र विद्यालय बनसारोळ्याचे आदर्श क्रीडा शिक्षक श्री मनेश गोरे यांना राज्य स्तरीय महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असुन सदरील परिषदेच्या वतीने मराठवाडा विभागीय शिक्षण परिषद व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा दि. ८ सप्टेंबर २०२४ रोजी रविवारी कुसुम सभागृह नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.
महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने दर वर्षी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. राज्य भरातून आलेल्या अर्जांच्या छाननी अंती परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.सन २०२४ च्या राज्यस्तरीय आदर्श क्रिडा शिक्षक पुरस्कारासाठी केज येथील महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा चे क्रीडा विभाग प्रमुख व क्रीडा शिक्षक मनेश बब्रुवान गोरे यांनी क्रिडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना घडवत जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची निवड झाली आहे.
क्रिडा शिक्षक मनेश बब्रुवान गोरे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. क्रिडा शिक्षक मनेश बब्रुवान गोरे यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
आदर्श शिक्षक म्हणून आपली निवड शिक्षणक्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल झाली असुन आपले याबद्दल आपले ….
हार्दिक अभिनंदन !!!