लेकीच्या यशाने डॉक्टर दाम्पत्याला गगन ठेंगणे
शेख फरहा मुखतार याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर येथे एमबीबीएस साठी निवड

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
शैक्षणिक विश्व (बातमी संकलन डॉ जावेद शेख)
बीड जिल्हा प्रतिनिधी
फरहा शेख मुखतार हिची वैद्यकीय शिक्षणासाठी राज्यातील नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर येथे एमबीबीएससाठी निवड झाली आहे. लेकीच्या यशाने डॉक्टर दाम्पत्याला गगन ठेंगणे झाले असून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. तेच शेख फरहा च्या बाबतीत ही म्हण तंतोतंत लागू पडते. लहानपणापासून तिने शिक्षणात चुणूक दाखवली. तिचे दहावी व बारावी पर्यंतचे शिक्षण बीड येथील मिल्लिया महविद्यालयात झाले. दहावीत तिला ९० टक्के गुण मिळाले. तर बारावीत ८० टक्के गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे नीट परीक्षेत ६६६ गुण घेऊन नीट परीक्षेत बायलॉजी या विषयामध्ये ३६० पैकी ३६० मार्क्स तिने घेतले त्यामुळे तिचा नंबर औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी एमबीबीएससाठी निवड झाली.
शेख फरहाचे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत. तसेच तिचे दोन्ही आजोबा एका नामांकित महाविद्यालयाचे माजी प्राचार्य होते. वडील शेख मुख्तार गुलाम दस्तगीर हे मूळचे बीड जिल्ह्यातील नांदुर घाट येथील रहिवासी आहेत. बारावीत चांगले गुण मिळवून लेकीला डॉक्टर करण्याचे स्वप्न होते. त्याकरिता त्यांनी कठोर परिश्रम घेतले होते.
शेख फरहा यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक, शिक्षकवृंद, आजोबा आजी, आई-वडिल, चुलते काका यांना दिले.तिच्या यशाबद्दल तिचे जिल्ह्याभर सर्वत्र कौतुक होत आहे. तिला पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.