संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष श्री.मनोज दादा आखरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
आष्टी येथील गोरगरीब मुलांना शालेय साहित्याचे वाटप

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
सामाजिक विशेष
आष्टी तालुका प्रतिनिधी (विकास मस्के)
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री.मनोज दादा आखरें यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी येथील आश्रम शाळेतील गोर गरीब मुलांना प्रा.शशिकांत कन्हेरे सर यांच्या शुभहस्ते शालेय साहित्याची मदत करून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक शिवश्री शशिकांत कन्हेरे सर होते.यावेळी मुख्याध्यापक राठोड सर यांनी प्रास्ताविक केले.
या प्रसंगी बोलताना कन्हेरे सर म्हणाले की,आपण या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत समाजातील गरजू आणि गरीब मुलांना शालेय साहित्य देऊन दादांचा वाढदिवस साजरा केला.येथून पुढे आपल्या आश्रमासाठी जी काही अडचण किंवा मदत लागली तर कधीही मला किंवा संभाजी ब्रिगेड टीम ला हाक मारा आम्ही सर्व ताकदीनिशी आपल्यासोबत उभा राहू अशी ग्वाही दिली.या कार्यक्रमासाठी
संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अविनाश जगताप,शिवसेना तालुका प्रमुख सुभाष राऊत,नवजीवन संगोपन केंद्र अध्यक्ष विकास म्हस्के मेजर,अमोल निकाळजे,दादा ढवळे,सुशांत कन्हेरे,निखिल राऊत,मुख्याध्यापक राठोड सर,शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते. सर्व विद्यार्ध्याच्या वतीने पुन्हा एकदा दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.