एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तत्काळ उपाययोजना करा – गणेश बजगुडे पाटील
इंटकच्या (राष्ट्रीय मजदूर काँग्रेस) वतीने एसटी महामंडळ संपला पाठिंबा- रामधन जमाले

बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड / महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एस.टी) कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी दि.०३/०९/२०२४ पासुन सुरु असलेल्या आंदोलनास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणित इंटक कामगार संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी बोलताना काँग्रेस पक्षाचे बीड तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे म्हणाले की, १०/१२ तास काम करून देखील एसटी कर्मचार्याना राज्य शासकीय कर्मचारी यांच्याप्रमाणे वेतन वाढ मिळत नाही, महागाई भत्ता फरक बिल मिळात नाही. एकीकडे रोज नवनवीन योजना काढून सरकार राज्यातील जनतेची दिशाभूल करत आहे मात्र रात्रनदिवस मेहनत करून एसटी कामगाराणा स्वतःच्या न्याय मागण्यासाठी आंदोलन करावे लागते ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. बीड तालुका काँग्रेस कमिटी व इंटक कामगार संघटना आपल्या सोबत असुन शासनाने आपल्या मागण्यांवर तत्काळ उपाययोजना कराव्यात असेही ते म्हणाले. यावेळी पाठिंब्याचे पत्र एस टी कर्मचारी कृती समितीचे महादेव खांडे, संतोष गणगे, कल्याण जाधव, बाबा डोळस, अरविंद इंगोले, नवनाथ टाकले, यांच्याकडे देण्यात आले. यापत्रावर काँग्रेस पक्षाचे बीड तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील, इंटकचे जिल्हाध्यक्ष रामधन रानबा जमाले, उपाध्यक्ष संदीप झिंजुर्के, सचिव सखाराम बेंगडे, दयानंद धुरंधरे, सुदाम भोपळे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.