अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला शंभर टक्के नुकसानभरपाई सह कर्जमाफी करा – गणेश बजगुडे पाटील
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड / मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा व तालुक्यातील सर्वच महसुल मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली असताना बीड तालुक्यात २४ तासाहून अधिक काळ सततचा मुसळधार पाऊस झालेला असुन शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणीच पाणी झाल्यामुळे उभे पीक व शेती देखील वाहून गेलेली आहे. सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या खरिपाच्या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना प्रशासनाने पांचनाम्याच्या नावावर वेळकाढूपणाची भुमिका नघेता सरसकट १०० टक्के नुकसान भरपाई सह कर्जमुक्ती करावी व हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना विनाआट विनाविलंब मदत करण्यात यावी. त्याच बरोबर सोयाबीन कापुस दरवाढ, पीकविमा रक्कम तत्काळ मिळाली पाहिजे अश्या मागणीचे निवेदन आज बीड तालुका काँग्रेस कमिटी व शिवक्रांती युवा परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी बीड यांना देण्यात आले. यानिवेदणावर तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील, इंटकचे जिल्हाध्यक्ष रमधन जमाले, सखाराम बेडगे, हनुमान घोडके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत