वैभवशाली महाराष्ट्र न्यूजच्या आष्टी तालुका प्रतिनिधीपदी विकास मस्के यांची निवड
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज मिडिया ग्रुपचे प्रमुख गोविंद शिनगारे यांनी केली नियुक्ती

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
वैभवशाली महाराष्ट्र /बीड प्रतिनिधी
आष्टी तालुका निवड विशेष/समृद्ध महाराष्ट्राच्या सर्वांगीण बातम्यांसाठी या संकल्पनेतून प्रचार व प्रसार माध्यमांत डिजिटल मिडिया म्हणून नावारूपास आलेले वैभवशाली महाराष्ट्र न्यूजची विशेष ओळख जनसामान्यांत आहे वैभवशाली महाराष्ट्र न्यूजचे कार्य सर्व ठिकाणी यशस्वीपणे सुरू करण्याच्या दृष्टीने आष्टी तालुक्यातील मु.पो . आष्टा (हरिनारायण) येथील माजी सैनिक , सामाजिक चळवळीतील सक्रिय नेतृत्व तसेच नवजीवन संगोपन केंद्राचे अध्यक्ष विकास सोन्याबापू मस्के (मेजर) यांची वैभवशाली महाराष्ट्र न्यूज डिजिटल मिडियाच्या आष्टी तालुका (पाटोदा शिरूर) विधानसभा प्रमुख प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात आली असून वैभवशाली महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक व सह्याद्री मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष गोविंद नाना शिनगारे यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली आहे. सदरील निवडीबद्दल नवनिर्वाचित आष्टी तालुका प्रतिनिधी विकास मस्के (मेजर) यांना मित्र परिवार सह वैभवशाली महाराष्ट्र न्यूज च्यावतीने पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले.