ना. समीर काझी वक्फ बोर्डाला नवी दिशा देतील – सलीम जहाँगीर
भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने काझी यांचा सत्कार

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
बीड ( प्रतिनिधी )
महायुतीतील शिवसेनेच्या कोट्यातून बीड येथील समीर काझी यांची महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. अत्यंत अभ्यासू आणि अनुभवी नेतृत्व असलेले समीर काझी हे राज्य वक्फ बोर्डाला नवी दिशा देतील असा विश्वास भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश महामंत्री सलीम जहाँगीर यांनी व्यक्त केला.
बीड येथील कार्यालयात राज्य वक्त बोर्डाचे अध्यक्ष ना समीर काझी यांचा भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश महामंत्री सलीम जहांगीर म्हणाले, नवनिर्वाचित वक्फ बोर्डचेअरमन ना. समीर काझी यांचे भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. समीरभाई यांचे आणि माझे कौटुंबिक नातेसंबंध असून आम्ही मित्र देखील आहोत. अभ्यासू, हुशार आणि चाणाक्ष असलेले समीरभाई नक्कीच वक्फ बोर्डाला एक नवी दिशा देतील. येणाऱ्या काळात नवीन योजना कार्यान्वित करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. समीर काझी हे बांधकाम क्षेत्रातील एक नावाजलेले व्यक्तिमत्त्व आहे. वक्फ बोर्डाच्या कामात यापूर्वी दिरंगाई होत होती. मात्र आता या कामांना गती मिळत आहे. कर्मचारी भरतीमुळे कामे अधिक गतीने होणार असून त्यात जास्तीत जास्त सुसूत्रता येईल. मस्जिद नोंदणीसह इतरही अनेक कामे ऑनलाईन होत असल्याने नागरीकांना होणारा त्रास कमी होणार होणार आहे. आपल्या अभ्यासू आणि अनुभवी वृत्तीचा फायदा समीर काझी यांच्या माध्यमातून त्यांच्या कामात होणार असल्याचे सलीम जहाँगीर यांनी सांगितले. यावेळी
नूर लाला खान, रफिक कुरेशी,रियाज सिद्दीकी, आमु सय्यद , रविंद्र शिंगारे, सज्जाद काझी, वहिद पठाण, युनूस शेख, तकी शेख, सोयल बेग, अनीस शेख आदींची उपस्थिती होती.