मनेश गोरे यांना आदर्श क्रिडा शिक्षक पुरस्कार प्रदान
महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषदेच्या वतीने पुरस्काराचे वितरण

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
केज प्रतिनिधी (महादेव दौंड)
महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक/ प्राध्यापक परिषदेच्या वतीने मराठवाडा विभागीय शिक्षण परिषद व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा दि. ८ सप्टेंबर २०२४ रोजी रविवारी कुसुम सभागृह नांदेड येथे संपन्न झाले आहे.
महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने दर वर्षी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. राज्य भरातून आलेल्या अर्जांच्या छाननी परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. सन २०२४ च्या राज्यस्तरीय आदर्श क्रिडा शिक्षक पुरस्कारासाठी केज येथील महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा चे क्रीडा विभाग प्रमुख व क्रीडा शिक्षक मनेश बब्रुवान गोरे यांनी क्रिडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना घडवत जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार मिळाला आहे. क्रिडा शिक्षक मनेश बब्रुवान गोरे यांना मा.आ. जयप्रकाश दांडेगावकर ( माजी सहकार मंत्री महाराष्ट्र, राज्य ), मा. गिरीष भाऊ जाधव, प्रा. डॉ. नागेश कल्याणकर, मा. व्यंकटराव जाधव मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. क्रिडा शिक्षक मनेश बब्रुवान गोरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा चे सर्व संचालक मंडळ , शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, गावातील सर्व नागरिक ,तालुका क्रीडा समन्वयक दत्ता देवकते, सखाराम वाघमारे, पिराजी कुसळे, मनोज देशमुख, पुरुषोत्तम देशमुख, चंद्रकांत सोळंके, प्रवीण ठोंबरे, अंकुश गायकवाड, सतीश बलुतकर तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक यांनी शुभेच्छा दिल्या.