भारतीय भटके विमुक्त जाती जमाती विकास संघटने च्या आष्टी तालुका अध्यक्ष पदी अविनाश विटकर यांची निवड
सामाजिक संघटना निवड विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
आष्टी प्रतिनिधी.विकास म्हस्के
आष्टी तालुक्यातील भटके विमुक्त जाती जमातीचे अनेक प्रश्न प्रलंबित असून येणाऱ्या काळात त्यांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी किंवा वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून लढा उभारणे गरजेचे आहे तो लढा उभारून भटक्या विमुक्त जाती जमातीतील गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय भटके विमुक्त जाती जमाती संघटनेच्या आष्टी तालुका अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते मा.अविनाश विटकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
ही निवड जिल्हाध्यक्ष हनुमंत धनवटे उपजिल्हाध्यक्ष विकास म्हस्के मेजर यांच्या हस्ते निवड पत्र देऊन करण्यात आली.
या निवडीनंतर नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष अविनाश विटकर बोलताना म्हणाले की माझ्यावर संघटनेने जी जबाबदारी दिली आहे ती मी योग्य पद्धतीने पार पाडून गोरगरीब गरजू लोकांचे प्रश्न सोडून ज्यांना कोणाला अडचण येईल त्यांच्यासाठी 24 तास उपलब्ध राहून संघटना वाढीसाठी योग्य रीतीने काम करील
या कार्यक्रम प्रसंगी रासपचे पाटोदा तालुका अध्यक्ष आसाराम महारनवर महिला आघाडी पाटोदा तालुका अध्यक्ष कविता राहीज, पाटोदा तालुका सचिव अनिता महारनवर , आष्टी तालुकाअध्यक्ष शोभा सकट, उपाध्यक्ष शारदा चखाले, माजी सभापती मीना धनवटे, भटके विमुक्त संघटना आष्टी शहराध्यक्ष विमल विटकर तसेच पोपट गुंजाळ, सिद्धांत योगे,पत्रकार योग गुरू संपत गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष अविनाश विटकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.