महाराष्ट्रवैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिक

भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे शिवसन्मान परिषदेचे १५ सप्टेंबर रोजी आयोजन

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

  सामाजिक संघटना विशेष

=======================

अंबाजोगाई प्रतिनिधी

भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे शिवसन्मान परिषदेचे १५ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. तरी या परिषदेस महाराष्ट्रातील तमाम बहुजन जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) चे राज्य उपाध्यक्ष मधुकर काळे, भारत मुक्ती मोर्चाचे बीड जिल्हा प्रभारी नासेर शेख, भारत मुक्ती मोर्चाचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल धाईजे यांनी केले आहे.

 

याबाबत अधिक माहिती देताना सांगितले आहे की, पुणे येथे भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवसन्मान परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद रविवार,दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० यावेळेत ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे मैदान, आरटीओ ऑफिस शेजारी, पुणे येथे होणार आहे. या शिवसन्मान परिषदेचे नेतृत्व तथा अध्यक्ष वामनजी मेश्राम (राष्ट्रीय अध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा, नवी दिल्ली) हे करणार आहेत. तर या परिषदेचे नेतृत्व तथा विशेष अतिथी म्हणून प्रविणदादा गायकवाड (प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड) हे उपस्थित रहाणार आहेत. तसेच उद्घाटक म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढाव (संस्थापक, हमाल पंचायत, महाराष्ट्र) हे आहेत. यावेळी इतिहासकार मा.म.देशमुख (जेष्ठ इतिहासकार, महाराष्ट्र), ज्ञानेश महाराव (संपादक, साप्ताहिक चित्रलेखा), किरण माने (प्रसिद्ध सिने अभिनेते), श्रीमंत कोकाटे (प्रसिद्ध इतिहास संशोधक), प्रदिपदादा सोळुंके (प्रसिद्ध व्याख्याते, महाराष्ट्र) व अमरजित पाटील (शिवचरित्र अभ्यासक, महाराष्ट्र) या परिषदेला विशेष अतिथी म्हणुन उपस्थित रहातील. या शिवसन्मान परिषदेचे विषय १) छत्रपती शिवाजी महाराज व बहुजन महापुरूष यांची हत्या, ब्राम्हणीकरण, चरित्रहनन व स्मारकांची विटंबना या मागील ब्राम्हणी षडयंत्र- एक गंभीर चिंतन., २) घाई गडबडीत पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार करून शिवसन्मान न करता त्याचा निवडणुकीत वापर करून ब्राम्हणी राज्य उभारणीचे आरएसएस भाजप सरकारचे षडयंत्र-एक चर्चा अथवा आरएसएस आणि ब्राम्हणी छावणीचे लोक ब्राम्हणी वर्चस्व आणि राज्य स्थापन करण्यासाठी बहुजन महापुरूषांचा सन्मान न करता त्यांच्या नांवाचा केवळ वापर करीत आहेत. -एक विचार मंथन., या गंभीर विषयांवर महाराष्ट्रातील विद्वान मान्यवर मार्गदर्शन करतील. या अत्यंत महत्वपुर्ण ‘शिवसन्मान परिषदेला’ महाराष्ट्रातील तमाम बहुजन जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन किशोर तुपारे, प्रशांत कुंजीर, संतोष हगवणे, निखिल गडकर, राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) चे राज्य उपाध्यक्ष मधुकर काळे, भारत मुक्ती मोर्चाचे बीड जिल्हा प्रभारी नासेर शेख, भारत मुक्ती मोर्चाचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल धाईजे यांच्यासह भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.