आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

गौरव कर्तृत्वाचा :श्री.जाहेर रहेमान शेख यांना इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज चा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

बीड जिह्याच्या शिक्षकांने जिल्ह्याची मान उंचावली -डॉ.अनिता दहिफळकर

समृद्ध महाराष्ट्राच्या सर्वांगीण बातम्यांसाठी…

  वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष 

सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ जावेद शेख यांच्या छोट्या भावाचे कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षक म्हणून उल्लेखनीय कार्य.

बीड/प्रतिनिधी

 

समाजात निस्वार्थ भावनेने व निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ईनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचा आदर्श शिक्षक पुरस्कार श्री. जाहेर रहेमान शेख यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला .

सतत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास , शाळेत राबवलेले विविध उपक्रम तसेच शाळेच्या प्रगतीसाठी आणि विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी तसेच त्यांनी विशेष म्हणजे नवोदय, स्कॉलरशिप साठी ही बरेच विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी स्वतः ला झोकून देऊन केलेले कार्य याची दखल घेऊन शिक्षक श्री.जाहेर शेख अ यांना इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज चा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामुळे बीड जिल्ह्यातील दहिफळ वडमावली गावचा शिक्षक कोल्हापूर येथे राहून आपल्या जिल्ह्याची मान उंचावली असल्याचे दहिफळ गावचे सरपंच डॉ अनिता दहिफळकर यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.दहिफळ वडमाऊलीचे सर्व गावकऱ्यांनी शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.