जन हक्कांच्या सुविधासाठी आष्टी तहसील कार्यालयावर गांधीगिरी आंदोलन

(आष्टी बातमीदार) विकास म्हस्के
तहसिलदार तथा न्यायदंडाधिकारी जन हक्कांच्या सुविधासाठी आष्टी तहसील कार्यालयावर गांधीगिरी आंदोलन तहसिलदार तथा न्यायदंडाधिकारी कार्यालय आष्टी यांच्या कार्यालयात आम्हां भारतीय नागरिकांना मानवी हक्काच्या सुविधा भेटत नसल्याकारणाने 14 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता आष्टी तालुक्यातील संविधान प्रेमी नागरिक करणारं गांधीगिरी आंदोलन सविस्तर माहिती अशी की, आष्टी तहसील कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सुविधा मिळत नाहीत. प्राथमिक सुविधा सुद्धा भेटत नाहीत . तहसीदार कार्यालय व परिसरात पिण्याचे पाणी स्वच्छ व मुबलक नाही. महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक व पुरुषांसाठी स्वतंत्र मुतारी व शौचालयाची सोय नाही. म्हणून कार्यालयाच्या कंपाउंड भोवती महिला पुरुषांना नैसर्गिक विधी करावा लागत आहे .कार्यालयात व परिसरात घाणीचे साम्राज्य आहे.गवत,झाडे मोठमोठे झाले आहेत. कर्मचारी मावा खाऊन त्यांच्या थुकीनें कित्येक परिसरात सडा पडला आहे . कार्यालयातून देण्यात येणारे कागदपत्र, खासरा पत्रक, कुपन शपथपत्र, संजय संजय गांधी, श्रावणबाळ योजना,फेरफार व अन्य कागदपत्रासाठी कित्येक नागरिकांची अनाधिकृत पैश्याच्या स्वरूपात सर्रास लुट केली जात आहे. कुठेही नियमावलीचा बोर्ड नाही. किंवा वसूल केलेल्या रक्कम ची पावती भेटत नाही. नागरीकांच्या हक्काच्या सुविधाची कोणतीही माहिती कर्मचारी स्वतःहून जाहीर प्रकटन करीत नाही. तहसिल मध्ये राजकीय पक्ष पार्ट्यांच्या लोकांचा हस्तक्षेप जास्त दिसून येतो. व कर्मचारी त्यांनाच प्राधान्य देतात. सर्वसामान्यांना मात्र ते कर्मचारी उद्धटपणाची वागणूक देत आहेत. हे सर्व 14 ऑक्टोबरच्या आत थांबले नाही तर गांधीगिरी पद्धतीने आष्टी तहसील वर आंदोलन करण्याचा इशारा दिलेल्या निवेदनात समाजसेवक श्री. परमेश्वर रामचंद्र घोडके श्री.स्वप्निल शिवाजी पोटे युवा नेते शौकत पठाण धुळाजी लकडे अशोक माने कैलास दरेकर प्रा. राम बोडखे शेख अजमुद्दिन यासह आष्टी तालुक्यातील संविधान प्रेमी ग्रुपमेंबर यांनी गांधीगिरी आंदोलनाचा इशारा दिला आहे.