भटके विमुक्त जाती जमाती जनसंवाद याञा सुरुवात

आष्टी तालुका प्रतिनिधी /विकास मस्के
बीड :- आज भटके जाती विमुक्त जमाती बीड जिल्हा अध्यक्ष मा.हनुमंत धनवटे (महाराज) साहेब यांचे नेतृत्वाखाली श्री क्षेत्र गहिनीनाथ गड चिंचोली नाथ ता.पाटोदा जि.बीड या ठिकाणावरून जनसंवाद याञेला सुरूवात झाली.
यावेळी अ.नगर जिल्हा अध्यक्ष मा.रमेश धोत्रे, जामखेड तालुका अध्यक्ष श्री. नवनाथ जाधव मा. श्री. गोवर्धन जाधव, चिंचोली नाथ गावचे सरपंच मा. ज्योतीताई बबन सांगळे मा. उपसरपंच धर्मराज आदिनाथ सांगळे, मा. जालिंदर विलासराव सांगळे, मा. निलेश मल्हारी गर्जे, मा. ज्ञानदेव विठ्ठल जाधव, मा. भिमराव बाळाजी सांगळे, बबन अर्जुन सांगळे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत या जनसंवाद याञेला सुरूवात झाली आहे.
या जनसंवाद याञे निमित भटके विमुक्त बंधू आणि भगिनींशी संवाद होत असुन तेथील सामाजिक प्रश्न समजावून घेऊन त्या निश्चित सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
या जनसंवाद याञेचे ठिकठिकाणी स्वागत होत आहे.
भटके विमुक्त जनसंवाद याञा आणि सामाजिक प्रश्न यावर सोमवार दि. 14 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12.00 वाजता शासकीय विश्राम गृह समोर, तालुका पाटोदा, जि. बीड येथे भटके विमुक्त जाती जमाती चिंतन शिबीर आयोजित केला आहे.
सदर चिंतन शिबीर करिता भटके विमुक्त समाजातील मा. कु. संगिता ताई पवार, यवतमाळ आणि मा. श्री. सुधीर अनवले, अध्यक्ष – भटके विमुक्त विकास संघटना इ. मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.