केज उपजिल्हा रुग्णालयात मानसिक आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन संपन्न
मानसिक आजार हा मनाचा आजार -डॉ.अशोक थोरात

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
आरोग्य विशेष
केज/प्रतिनिधी
राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत आयोजित केज उपजिल्हा रुग्णालयात मानसिक आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ .राहुल मोगले, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ .दत्तात्रय केंद्रे हे हजर होते.ताण तणाव तसेच मानसिक आजार हे मनाचा आजार असून तंबाकू, दारूचे व्यसन वेगवेगळे विचार मनात येणे अशा रुग्णांनी आपली मोफत तपासणी करून घ्यावी असे मार्गदर्शन डॉ.अशोक थोरात यांनी म्हटले .यावेळी प्रमुख उपस्थिती डॉ दत्तात्रय केंद्रे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय केज ,डॉ.राहुल मोगले ,डॉ अदमाने,डॉ.पाटिल मॅडम,डॉ.सुलतान हुसेन,डॉ मुंडे,मॅटरण पळशीकर मॅडम,व श्रीकृष्ण नागरगोजे रक्तपेढीवैज्ञानिक अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.