वैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिक

साहित्य निकेतन ग्रंथालयाच्या वतीने २२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध पत्रकार तथा अभ्यासू वक्ते उदय निरगुडकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन

जागतिक किर्तीचे पखवाज वादक उध्दवराव बापू आपेगांवकर यांचे पखवाज वादन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

येथील साहित्य निकेतन ग्रंथालय, अंबाजोगाई यांच्या वतीने प्रसिद्ध पत्रकार तथा अभ्यासू वक्ते उदय निरगुडकर यांच्या व्याख्यानाचे व जागतिक किर्तीचे पखवाज वादक उध्दवराव बापू आपेगांवकर यांच्या मंगलमय पखवाज वादनाचे आयोजन मंगळवार, दिनांक २२ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. अशी माहिती देवून या कार्यक्रमास अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन साहित्य निकेतन ग्रंथालय, अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले अंबाजोगाईतील वैभवशाली ग्रंथालय साहित्य निकेतनने नुकतेच ८० व्या वर्षांत पदार्पण केले आहे. त्यानिमित्त समाजामध्ये पुस्तक प्रेम वृद्धिंगत व्हावे, समाजातील सांस्कृतिक व चिंतनशील विचारांची देवाण – घेवाण वाढावी या हेतूने साहित्य निकेतन ग्रंथालय आपल्या परीने विशेष प्रयत्न करीत आहे. अशाच एक प्रयत्नांतून यावर्षी ऑगस्ट महिन्यात गीत रामायणाचे रचयिते व प्रख्यात साहित्यिक, कवी, गीतकार ग.दि.माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली रसाळ कृष्ण कथा “गीत गोपाल”चा संगीतमय कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला अंबानगरीतील सुजाण नागरिक, रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. पुन्हा एकदा असाच एक वेगळा विषय घेऊन येत्या मंगळवारी, दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह, अंबाजोगाई येथे दुपारी ४ वाजता जागतिक किर्तीचे पखवाज वादक उध्दवराव बापू आपेगांवकर यांचे मंगलमय पखवाज वादन सादर होणार आहे. त्यानंतर नामवंत पत्रकार व चिंतनशील अभ्यासू वक्ते उदय निरगुडकर यांचे ‘विकसित भारतातील महाराष्ट्राचे योगदान’ या विषयावरील व्याख्यान होणार आहे. उदय निरगुडकर यांनी मागील दोन दशकांहून अधिक काळ शिक्षण, पायाभूत सुविधा, व्यवस्थापन कौशल्य, आर्थिक क्षेत्र, आयटी उद्योग तसेच न्यूज मिडीया अशा अनेक ठिकाणी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाच्या पदांवर कार्य केले आहे. त्यांचा अनुभव व त्यातून त्यांनी केलेले चिंतन ऐकण्यासाठी आपण व आपले सर्व सहकारी यांनी व्याख्यानासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आग्रहाचे आमंत्रण व आवाहन साहित्य निकेतन ग्रंथालय, अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.