वक्तृत्व स्पर्धा हे समाज परिवर्तनाचे एक माध्यम – डॉ.हेमंत वैद्य
*स्व.नाना पालकर स्मृति आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा समारोप

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
समाज हा राष्ट्रातील संवेदनशील भाग असून समाज सकारात्मक करण्यासाठी तसेच समाजात दिशादर्शक काम करण्यासाठी विचारांची देवाण-घेवाण करावी लागते त्यामुळे स्व.नाना पालकर वक्तृत्व स्पर्धा समाज परिवर्तनाचे एक माध्यम असल्याचे प्रतिपादन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य यांनी केले.
ते येथील स्व.नाना पालकर स्मृति आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह बिपिन क्षीरसागर, संकेत मोदी, केंद्रीय कार्यकारणी सदस्य बाबुराव आडे, प्रशासकीय समन्वय समितीचे मुख्य समन्वयक प्रा.चंद्रकांत मुळे, दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ.हेमंत वैद्य यांनी ही वक्तृत्व स्पर्धा मागील 53 वर्षांपासून अविरत सुरू आहे. त्याबद्दल त्यांनी खोलेश्वर महाविद्यालयाचे कौतुक केले. यावेळी बिपिन क्षीरसागर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना या स्पर्धेचे कौतुक केले. आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द आपल्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी अशा स्पर्धांमधून सहभाग घ्यावा लागतो. या स्पर्धेच्या माध्यमातून मराठवाड्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आपला नांवलौकिक केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्व.नाना पालकर स्मृती आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा यातील सांघिक फिरता चषक कु.विजेता विकासराव कुलकर्णी व चि.शाम विष्णू घुले (आय.एल.एस विधी महाविद्यालय, पुणे) यांना मिळाला. वैयक्तिक प्रथम पारितोषिक कु.विजेता विकास कुलकर्णी (आय.एल.एस.महाविद्यालय, पुणे ) यांना रोख रक्कम रूपये 7,001/- व सन्मानचिन्ह हे पारितोषिक मिळाले. द्वितीय पारितोषिक चि.सुधीर गिरीधर जाधव (लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महाविद्यालय, मुखेड जि.नांदेड) यांना रोख रूपये 5,001/- व सन्मानचिन्ह मिळाले तर तृतीय पारितोषिक चि.महेश जनार्धन उशीर (न्यू आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, अहिल्यानगर ) यांना रूपये 3,001/- व सन्मानचिन्ह हे पारितोषिक मिळाले. यावेळी दोन उत्तेजनार्थ 1101 /- रूपयांची पारितोषिके अनुक्रमे कु.शिवकन्या नवनाथ शिंदे ( खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई ) आणि कु. गीता माधव वाडकर ( महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा जि.लातूर) यांना मिळाले. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, मुखेड, नांदेड, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, बीड, परभणी आदी जिल्ह्यांतून अनेक विद्यार्थी स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कु.शिवकन्या शिंदे कु.मोनिका पोटभरे या स्पर्धकांनी मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ.स्वरूपाताई कुलकर्णी, ऍड.बळीराम पुरी, प्रा.डॉ.राऊत यांनी काम पाहिले. यावेळी स्वरूपाताई कुलकर्णी यांनी परीक्षक म्हणून आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धाप्रमुख प्रा.योगेश कुलकर्णी यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ.तृप्ती पाडेकर, प्रा.मोहिनी वेडे, प्रा.विनय राजगुरू यांनी केले. उपस्थितांचे आभार स्पर्धा सहप्रमुख प्रा.तुळशीराम मुंढे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता कल्याण मंत्राने झाली. यावेळी योगेश्वरी देवल कमिटीचे कोषाध्यक्ष शिरीष पांडे, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ.प्रवीण जोशी, महेश सेलुकर, सौ.वट्टमवार या बरोबरच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, सेवानिवृत्त कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती.