महाराष्ट्र विद्यालयाच्या आदेश शिरसाठ ची कुस्ती स्पर्धेत राज्य पातळीवर निवड
महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा येथील विद्यार्थ्याचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
शालेय क्रीडा स्पर्धा विशेष
बीड जिल्हा प्रतिनिधी
केज तालुक्यातील बनसारोळा येथील बनेश्वर शिक्षण संस्था संचलित महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थी अदेश सिरसाठ यांने नुकत्याच पार पडलेल्या व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या शालेय अंतर्गत क्रीडा स्पर्धा दरवर्षी घेतल्या जातात. यापैकी शालेय क्रीडा कुस्ती फ्रीस्टाइल स्पर्धा 17 वर्षे व 65 किलो वजन वयोगटातील मुलांच्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्र विद्यालयातील *आदेश अतुल शिरसाठ* या विद्यार्थ्याने सहभाग घेतला आहे . तालुकास्तर , जिल्हा स्तर ,तसेच विभाग स्तर या प्रत्येक टप्प्यावर त्यांने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. प्रत्येक ठिकाणी आदेशाने स्वतःच्या कुस्ती खेळण्याच्या विशेष कौशल्याने पुढच्या स्पर्धकास चितपट करून आपल्या विजयाचे मुहूर्तमेढ रोवली . याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री भागवत दादा गोरे संस्थेचे सचिव डॉक्टर नरेंद्र काळे यांनी त्याचे विशेष कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम ज्येष्ठ शिक्षक आर .एम. काकडे सर तसेच सर्व सहकारी शिक्षक व शिक्षिका यांनी त्याचा सत्कार केला.क्रीडा शिक्षक मनेश गोरे सर यांनी त्याला मार्गदर्शन केले .
यापूर्वी झालेल्या जिल्हा क्रीडा कार्यालय छत्रपती संभाजी नगर विभागीय क्रीडा संकुल गारखेडा परिसर या ठिकाणी विभागीय स्तरावर यश मिळवल्यामुळे त्याला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तो पात्र झालेला आहे. याबद्दल शाळेच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला आणि त्याचे मार्गदर्शक मनीष गोरे सर यांचाही सत्कार करण्यात आला संपूर्ण परिसरातून त्याचे अभिनंदन होत आहे व त्याला पूढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या .