शिक्षणमहर्षी शामराव (दादा)गदळे व बाळूताई शामराव गदळे यांच्या पुण्यतिथी निमित्त मोफत आरोग्यशिबिर व इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन
सामाजिक उपक्रम विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज /प्रतिनिधी
बातमी संकलन डॉ जावेद शेख
तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली)येथील वडमाऊली विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक शिक्षणमहर्षी शामराव (दादा)गदळे व बाळूताई शामराव गदळे यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 2 नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक व धार्मिक कायकर्माचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 10 रक्तदान शिबीर,10 ते 1 दरम्यान मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे
या शिबिरात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात ,जिल्हा आरोग्य अधिकारी उल्हास गंडाळ यांच्यासह डॉ बालासाहेब कराड ,डॉ अनंत मुळे, डॉ अमोल गीते ,डॉ गणेश देशमुख,, डॉ सुरेश ठोंबरे,डॉ रामप्रभु तिडके ,डॉ रोहन गायकवाड ,डॉ लक्ष्मण वारे,डॉ चंद्रकांत तोंडे,डॉ प्रतीक्षा बावरे ,डॉ गंगाराम डोंगरे उपस्थित राहणार आहेत.
शनिवारी सांयकाळी 5 ते 7 या वेळेत ह. भ. प.निवृत्ती महाराज इंदूरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थितीत राहण्याचे आव्हान श्री साखहरी (तात्या ) गदळे ,सौ. अनिता -डॉ शशिकांत शामराव गदळे (दहिफळकर),डॉ. सौ.शालिनी-बालासाहेब कराड ,सौ.जयश्री-शरद शामराव गदळे ,सौ.उषा-राहुल सखाहरी गदळे ,सौ.भाग्यश्री-जयदत्त दहिफळकर यांनी केले आहे.