शिवचैतन्य जागरण यात्रेचे आज अंबाजोगाईत आगमन
यात्रेनिमित्त प.पू.स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांचा संत संदेश प्रवचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
शिवचैतन्य जागरण यात्रेचे आज शुक्रवार, दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती संभाजीराजे चौक, मोरेवाडी, अंबाजोगाई येथे आगमन होणार आहे. यात्रेनिमित्त प.पू.स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांचा संत संदेश प्रवचनाचा कार्यक्रम आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह, अंबाजोगाई येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती आयोजक दासोपंत संशोधन मंडळ, अंबाजोगाई यांच्या वतीने देण्यात आली आहे.
शिवचैतन्य जागरण यात्रेनिमित्त प्रमुख मार्गदर्शक प.पू.स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज ( कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्या उपाध्यक्ष, श्रीकृष्ण जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, मथुरा) यांचा संत संदेश प्रवचनाचा कार्यक्रम आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह, अंबाजोगाई या ठिकाणी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
*रामभक्त व भाविक बंधू – भगिनींना नम्र निवेदन :*
सर्व रामभक्त व भाविक बंधू – भगिनींना नम्र निवेदन करण्यात येते की, श्रीराम जन्मभूमी न्यास कोषाध्यक्ष व मंदिर निर्मिती मधील प्रमुख संतांपैकी एक असे भागवत कथाकार, भगवान श्रीराम कथाकार पूजनीय संत.श्री.गोविंददेव गिरी (पू.श्री. किशोरजी व्यास) महाराजांचे आगमन शुक्रवार, दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती संभाजीराजे चौक, मोरेवाडी, अंबाजोगाई येथे होत आहे. त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ व शिवचैत्यन्य यात्रानिमित्त छत्रपती संभाजीराजे चौक, मोरेवाडी येथून भव्य शोभायात्रा बाईक रॅली आयोजित केली आहे. या बाईक रॅली मध्ये प्रत्येक रामभक्तांनी सहकुंटूब सहपरिवार, पारंपारिक वेशात आपल्या बाईक / स्कूटीसह यावे. त्यानंतर आपल्या सर्वांना पू.श्री.गोविंददेवगिरी महाराजांच्या आशीर्वचनाचा लाभ मुकूंदराज सांस्कृतिक सभागृहात सकाळी १० वाजता मिळणार आहे. तरी सर्व रामभक्तानां व भाविक बंधू – भगिनींना विनंती आहे. की, आपण सर्वांनी जास्तीत – जास्त संख्येने उपस्थित राहावे. आणि सहकुटुंब सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक, दासोपंत संशोधन मंडळ, अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात आले आहे.