आरक्षणाच्या मागणीसाठी नांदुर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
बीड/ प्रतिनिधी
बीड तालुक्यातील नांदुरफाटा येथे माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराठी ता.अंबड जि.जालना येथील आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगेसोयरे आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी श्री मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण चालू आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज यांनी विविध ठिकाणी रास्ता रोको केले व प्रशासनाला याविषयी निवेदन दिले. याचप्रमाणे नांदुरफाटा येथे खर्डेवाडी , धावज्याचीवाडी, पांढऱ्याचीवाडी व परिसरातील बहुसंख्य मराठा समाजाकडून रस्त्यावर उतरून रस्ता रोको करण्यात आला. यावेळी मराठा आरक्षण मिळण्यासाठी विविध घोषणा दिल्या गेल्या तसेच मराठा समाजावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी ही निवेदनाद्वारे म्हटले गेले. शेवटी आंदोलनाचे निवेदन तलाठी आधापुरे यांच्या कडे देण्यात आले.यावेळी पोलिस उपनिरीक्षक गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.