अभिजीतराजे भोसले यांच्या वाढदिवसानिम्मित जि.प्रा.शाळा खर्डेवाडी येथे शालेय साहित्य वाटप

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
बीड/ प्रतिनिधी
बातमी संकलन (शहजी बापु भोसले)
आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळून स्वतःचे जीवन संपवत आहे .त्या उलट काही लोक निर्व्यसनी राहून समाजामध्ये आदर्श कार्य करत असतात. असेच एक उभरते नेतृत्व…..
साधारण परिस्थितीतून मार्ग काढत खर्डेवाडी सारख्या अतिशय लहान खेडेगावातून मुंबईसारख्या मायानगरीमध्ये स्वतःचे अस्तित्व तयार करणे पहावे इतके सोपे नाही. मायानगरीमध्ये राहून देखील गावची आस असणारा अभिजीत राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा खर्डेवाडी येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना भोसले, संतोष भोसले, दिलीप बेलवडकर, अमोल काळकुटे , पत्रकार शहाजीराजे भोसले, मुख्याध्यापक डोरले सर ,सहशिक्षक काळे सर, सहशिक्षक माने सर, ट्रेनी शिक्षक भोसले सर आदी गावकरी उपस्थित होते. शालेय उपक्रम राबवल्याबद्दल ट्रेनी शिक्षक भोसले सर यांनी आभार मानले.