अभिजीत पवार यांना राज्यस्तरीय युवा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहिर

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
बीड /प्रतिनिधी
बातमी संकलन – शहजी बापु भोसले
बीड जिल्ह्यातील दैनिक बीड चे संपादक अभिजीत पवार यांना राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती सेवा गौरव युवा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा 05 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वा. तालुका शिक्षक संघ पतसंस्था हॉल , 40 बिघा मलकापूर जि. बुलढाणा येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर जि. बुलढाणा संस्थापक अध्यक्ष विवेक सुभाष राजापुरे यांनी दिली आहे. क्षेत्रातील मान्यवरांना राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तसेच आदर्श पत्रकार पुरस्कार म्हणून बीड जिल्ह्यातील अभिजीत पवार यांना राष्ट्रभक्ती सेवा गौरव आदर्श युवा पत्रकार पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असून, शेतकऱ्यांसाठी अनेक वेळा मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवलेले अभिजीत पवार आहेत.
बीड चे युवा पत्रकार अभिजीत पवार यांनी आपल्या प्रिंट मीडिया न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, आर्थिक, तसेच सर्व स्तरातील बातम्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिक कार्य केले आहे. काही वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे अभिजीत पवार हे सामाजिक राजकीय याचे भान असलेले पत्रकार असून यांनी आत्तापर्यंत आपल्या लेखणी द्वारे समाजातील विविध घटकातील समस्यावर लिखाण करून न्याय देण्याचा प्रयत्न केला करत आहेत अशा तरुण पत्रकार्याच्या कार्याची दखल घेऊन या माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर जि. बुलढाणा यांनी राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे.
अभिजीत पवार यांनी बीड जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आपल्या लेखणी द्वारे वस्तुनिष्ठ लिखाण करून सामाजिक कार्यास न्याय देण्याचा प्रयत्न केला अशा या तरुण पत्रकाराचा गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने होत आहे. हे अभिमानाची गोष्ट आहे.
आत्तापर्यंत पत्रकारिता क्षेत्रात विविध प्रकारचे लेखन करून व सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेऊन केलेल्या कार्याची दखल वरील संस्थेने घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिजीत पवार यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त प्राप्त झाल्याबद्दल बीड जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कडून अभिनंदन करण्यात येत आहे.