सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या केज तालुका अध्यक्षपदी अनिल ठोंबरे तर सचिवपदी डॉ लतिफ शेख यांची निवड
संघाच्या तालुका कार्याध्यक्षपदी महादेव दौंड तर तालुका संघटकपदी काशीनाथ कातमांडे यांची वर्णी

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
सह्याद्री मराठी पत्रकार संघ केज तालुका निवड विशेष.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन..
केज प्रतिनिधी
केज दि .18 जानेवारी रोजी सह्याद्री मराठी पत्रकार संघाची 2025 वर्षासाठीची केज तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात येऊन केज तालुका पदाधिकारी निवडीची प्रक्रिया शासकीय विश्रामगृह येथे पार पडली असुन सह्याद्री मराठी पत्रकार संघ केज तालुका अध्यक्षपदी दैनिक सामना वृत्तपत्राचे पत्रकार व कराटे प्रशिक्षक श्री अनिल ठोंबरे सचिवपदी डॉ लतिफ शेख , कार्याध्यक्षपदी महादेव दौंड तर तालुका संघटकपदी काशीनाथ कातमांडे यांची निवड संघाचे अध्यक्ष गोविंद नाना शिनगारे , संघाचे पदसिद्ध सचिव तथा प्रदेशाध्यक्ष डॉ जावेद शेख , प्रदेश कार्याध्यक्ष शहजी भोसले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सर्वानुमते करण्यात आली असून सह्याद्री मराठी पत्रकार संघ हा मागील अनेक वर्षांपासून सामाजिक, कृषी , औद्योगिक , ग्रामीण , शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या विकासात्मक कार्यासाठी तसेच समाजहितासाठी कायम कटिबध्द राहिलेला आहे संघाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य तसेच सामाजिक जनजागृती संघ अविरत करत असुन संघाने पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव आवाज उठलेला आहे तसेच पत्रकारांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करत येणाऱ्या काळात केज तालुक्यात सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे काम तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करणार असल्याचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले व सर्व पदाधिकारी यांना निवडीनंतर पुढील वाटचालीसाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच मित्र सहकारी यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या व सर्वांच्या सहकार्याने सह्याद्री मराठी पत्रकार संघाची केज तालुका कार्यकारिणी निवड संपन्न झाली