बीडच्या कन्येच्या नेतृत्वात भारतीय महिला खो- खो संघाने मिळवले जगज्जेतेपद
केज तालुक्यातील कळंबअंबा गावच्या कन्येच्या नेतृत्वात भारत देशाने मिळवला जागतिक स्पर्धेत विजय

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
क्रीडा जगत विशेष डिजिटल मिडिया
देश विदेश विशेष
भारतीय महिला खो खो संघाच्या खेळाडूनी आपले वर्चस्व सिद्ध करत भारताला जगज्जेतापद प्राप्त करून देत देशाची मान जगात उंचावली आहे अशा या संघाच्या कळंबअंबा (ता. केज, जि. बीड) येथील कर्तबगार खेळाडू प्रियंका इंगळे हिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे. पहिल्या महिला खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारताने नेपाळचा 38 गुणांच्या प्रचंड फरकाने पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
प्रियंकाच्या सक्षम नेतृत्वाने आणि भारतीय महिला संघाच्या अप्रतिम खेळाने देशाचा गौरव पुन्हा जागतिक पातळीवर उंचावला आहे. हा क्षण संपूर्ण देशासाठी अभिमानाचा आहे.
भारतीय महिला खो-खो संघाचे आणि नेतृत्वकर्त्या प्रियंका इंगळे यांचे भारत देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच गाव खेडे , वाड्यावस्ती तसेच शहरी व ग्रामीण भागातील नागरिक तसेच संपूर्ण देशवासीयांकडुन भारतीय महिला खो खो संघाचे अभिनंदन करत कौतुकाचा वर्षाव होत आहे .
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज डिजिटल मिडियाच्या वतीने सर्व भारतीय महिला खो खो संघाचे हार्दिक अभिनंदन..!!