सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या केज ता. कार्याकारणीचा छावा मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी ठोंबरे यांच्या वतीने सत्कार
केज तालुकाध्यक्ष अनिल ठोंबरे , सचिव डॉ लतिफ शेख , कार्याध्यक्ष महादेव दौंड , तर तालुका संघटक काशीनाथ कातमांडे यांचा पार पडला सत्कार सोहळा

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज तालुका प्रतिनिधी
केज येथे 2025 या वर्षासाठी सह्याद्री मराठी पत्रकार संघाची केज तालुक्याची कार्यकारिणी निवड नुकतीच पार पडली असून संघाचे अध्यक्ष गोविंद नाना शिनगारे , संघाचे पदसिद्ध सचिव तथा प्रदेशाध्यक्ष डॉ जावेद शेख , प्रदेश कार्याध्यक्ष शहाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या केज तालुकाध्यक्षपदी अनिल ठोंबरे , तालुका सचिवपदी डॉ लतिफ शेख , तालुका कार्याध्यक्षपदी महादेव दौंड , तालुका संघटक पदी काशीनाथ कातमांडे , तालुका उपाध्यक्षपदी दत्तात्रय भाकरे यांच्या निवडी करण्यात येऊन येणाऱ्या वर्षाची संघाची केज तालुक्याची धुरा सदरील कार्यकारिणीवर देण्यात आली असुन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याचे वृत्त समजताच तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या याचाच एक भाग म्हणून छावा मराठा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शिवाजी दादा ठोंबरे यांच्या वतीने सदैव समाजात चांगल्या प्रकारे काम करत असलेल्या व्यक्तींना सामाजिक कार्याचे कौतुक केले पाहिजे या हेतूने संघाच्या पदाधिकाऱ्यांचे निवडी झाल्याबद्दल शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी विविध क्षेत्रातील मित्र परिवार राजेश बॅटरी केज येथील शिवाजी दादा ठोंबरे यांच्या दुकानी उपस्थित होते व या सर्वांच्या उपस्थित छावा मराठा संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला