डॉ उत्तम खोडसे यांच्या स्व. मेटे यांच्या नावाने गणेश मंडळांना देण्यात आलेल्या सन्मानपत्र संकल्पनेचे डॉ.ज्योतीताई कडून कौतुक
सामाजिक उपक्रम केज...!

वैभवशाली महाराष्ट्र न्युज नेटवर्क विशेष
पुणे प्रतिनिधी –
– शिवसंग्राम राज्य कार्यकारिणीची बैठक डाॅ.नितू मांडके हाॅल, टिळक रोड, पुणे येथे प्रदेशाध्यक्ष श्री.तानाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काल पार पडली. या बैठकीमध्ये डॉ.ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्याकडे शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सुञे सर्वानुमते सोपविण्यात आली .
शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष स्व.विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.ज्योतीताई मेटे यांनी स्वीकारावी,भाजपचा मित्रपक्ष या नात्याने आपली चोख कामगिरी बजावणाऱ्या शिवसंग्रामला न्याय देत भाजपाने राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषद सदस्यपदी डॉ.ज्योतीताई मेटे यांची शिफारस करावी,तसेच आगामी मंत्रिमंडळ विस्तारात डॉ.ज्योतीताई मेटे यांना स्थान द्यावे,अशा स्वरूपाचे ठराव शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.तानाजीराव शिंदे यांनी शिवसंग्रामच्या राज्यस्तरीय कार्यकारणी बैठकीदरम्यान एकमताने मंजूर करण्यात आल्याचे जाहीर केले. या बैठकीला राज्यभरातून शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हा परिषद युसुफ वडगाव सर्कलचे शिवसंग्राम नेते तथा स्व.विनायकराव मेटे सन्मान चिन्हाचे संकल्पक डॉ उत्तम खोडसे यांनी शिवसंग्राम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या प्रेरणादायी प्रवासाची यशोगाथा म्हणून केज तालुक्यातील विविध 50 गावांतील श्री गणेश मंडळांना देण्यात आलेले स्मृती सन्मान पत्र – 2022 ची प्रत देऊन कार्यवृत्तांत सादर केला. यावेळी त्यांच्या समवेत केज तालुकाध्यक्ष नामदेव गायकवाड ,सुमंत कदम सर , महेश भैय्या गुजर ,शंभुराजे लामतुरे , अक्षय खोडसे वाघमारे शिवाजी दादा , महिला पदाधिकारी अँड कुपकर ताई , श्रीमती हांगे ताई , श्रीमती पटाईत ताई व केज तालुका पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.