भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नवजीवन संगोपन केंद्र येथील गोरगरीब मुलांना शालेय साहित्य आणि कपडे वाटप कार्यक्रमाचे आयोजन
सामाजिक, शैक्षणिक विश्व डिजिटल मिडिया

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
आष्टी तालुका प्रतिनिधी
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नवजीवन संगोपन केंद्र येथील गोरगरीब मुलांना शालेय साहित्य आणि कपडे वाटप कार्यक्रमाचे आयोजन
आष्टी तालुक्यात नवजीवन फाउंडेशन संचलित नवजीवन संगोपन केंद्र येथे अनाथ,निराधार,ऊसतोड मजूर,वीटभट्टी कामगार,आदिवासी,भटके विमुक्त,गरीब,वंचित,दुर्लक्षित घटकातील मुलांचा मोफत सांभाळ करून शिक्षण दिले जाते.
या नवजीवन संगोपन केंद्रास शासनाचे कोणत्याही प्रकारचे अनुदान किंवा मदत मिळत नाही सदरील केंद्र समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून आणि मदतीतून चालवले जात आहे.
या अनाथ,निराधार मुलांना फुल ना फुलाची पाकळी मदत व्हावी.तसेच आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेने नवजीवन संगोपन केंद्र येथील गोरगरीब,अनाथ निराधार मुलांना प्रजासत्ताक दिनानिमित्त कपडे आणि शालेय साहित्य देऊन सामाजिक उपक्रम साजरा करन्यात येणार आहे.
अशी माहिती नवजीवन संगोपन केंद्र संस्थापक अध्यक्ष विकास म्हस्के मेजर यांनी दिली.