पिंपळगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव मध्ये हळदी कुंकू समारंभ संपन्न
सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज /प्रतिनिधी
पिंपळगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव मध्ये हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला.
मंगळवारी तीळ-गुळ व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण, स्वसंरक्षण, यावर जनजागृती करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला.
मकरसंक्रांतीनिमित्त मंगळवारी पिंपळगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव शाळेच्या अध्यक्षा डॉ.सौ.अनिताताई दहिफळकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांची ओटी भरून वाण देण्यात आले. त्यानंतर डॉ.सौ.अनिताताई दहिफळकर यांनी महिलांवर वाढलेल्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त करत महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृतीपर विचार मांडण्यात आले. स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजातील महिलांची उपस्थिती राहिली.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून सारणी (सांगवी) केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती धम्मदीपा दरबारे मॅडम,जेष्ठ विस्तार अधिकारी श्रीमती पठाण मॅडम,श्रीमती रेखा अतुल वाघमारे,सौ.रेश्मा बाबासाहेब घोळवे,सौ डोंगरदिवे सुरेखा,उपस्थित होते.
हळदी कुंकू कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका श्रीमती गायकवाड मॅडम, शेख मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक श्री.ढाकणे एच.ए.,वाघमारे राहुल,वाघ अमोल,आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती गायकवाड मॅडम यांनी व सूत्रसंचालन श्रीमती शेख जे. डी.मॅडम यांनी केले तर आभार श्री. ढाकणे एच. ए.यांनी मानले.