अखंड हरीनाम साप्ताहात मुस्लिम बांधवासाठी रोजा इफ्तार ची पंगत
पाटोदा च्या गावाकऱ्यांनी सामाजिक ऐक्या चे दिले उत्तम उदाहरण

अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
देशात आणि राज्यात एकीकडे राजकीय स्वार्थासाठी जाती धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी समाज विघातक घटक सक्रिय झाले असले तरी समाजातील अजूनही बहुतांश लोकांना जाती धर्मापलीकडे माणुसकी सर्वात मोठा धर्म असल्याचे दाखवून देत समाजिक ऐक्य कायम राहणार असल्याचा संदेश देणाऱ्या घटना पुढे येत आहेत.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म ) येथे दरवर्षी प्रमाणे अखंड हरीनाम सप्ताहात मुस्लिम बांधवासाठी रोजा इफ्तार च्या पंगती चे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व गावकऱ्यांनी सहभाग नोंदवून आम्ही सर्व गावकरी एक आहोत असा मोठा सामाजिक सदेश दिला आहे
पाटोदा गावात दरवर्षी प्रमाणे
याही वर्षी अखंड हरीनाम सप्ताह चे आयोजन सर्व गावाकऱ्या च्या वतीने करण्यात आले होते राम नवमी ते हनुमान जयंती या दरम्यान सप्ताह चे आयोजनाची 29 वे वर्ष आहे. काल्या च्या कीर्तन नंतर महाप्रसाद साठी सर्व गावकरी सहभागी असतात पण गावातील मुस्लिम बांधवाना रमजान चे रोजे सुरु असल्याने सप्ताहात त्यांच्या रोजा इफ्तार ची पंगतिचे आयोजन करण्यात आले यावेळी सरपंच अविनाश उगले,आनंद स्वामी, हभप उगले महाराज,श्रीकृष्ण तोडकर,अशोक देशमुख, बाळासाहेब जामदार, बालाजी साखरे, चंद्रकांत सर्वदे,गोविंद घोरपडे, वैजेनाथ तोडकर, होसेकर पडीत,विलास पन्हाळे, विलास पाटील, बलभीम जामदार,मौलाना शाहेद पठाण,हारून पठाण, इब्राहिम शेख, खलील पठाण, अलीम शेख, खाजामिया पठाण,ताजखा पठाण, जब्बार पठाण, मुन्शी सय्यद, इलाही पठाण, मुस्तफा शेख, युसूफ पठाण आदी सह गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होते
एकदरीत गावची सामाजिक ऐक्याची परंपरा आहे. सर्व सण उत्सव सामाजिक धार्मिक उत्सव एकमेकांना सहभागी करून घेऊन साजरे करण्यात येतात. राजकीय दृष्ट्या सुद्धा निवडणूक संपली कि दुसऱ्या दिवशी पासून सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्रित काम करतात हे विशेष