मा. मनेश गोरे यांना आदर्श शिक्षक व क्रीडारत्न महाराष्ट्र गौरव पुरस्कार – 2025 जाहीर
श्री बनेश्वर शिक्षण संस्था संचलित महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा येथील शिक्षक गोरे सर यांचा होणार विशेष गुणगौरव

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज तालुका प्रतिनिधी
केज तालुक्यातील बनसारोळा येथील श्री बनेश्वर शिक्षण संस्था संचलित महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत शिक्षक यांना तालुका , जिल्हा , विभाग , राज्य पातळीवरील तसेच शिक्षक संघटनांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल श्री मनेश गोरे सर यांना आजपर्यंत आदर्श शिक्षक म्हणून विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले असुन याच धर्तीवर नुकताच दैनिक शिवजागर , विश्वनाथ फाऊंडेशन व इन्फोडॅड यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्य पातळीवरील मानाचा आदर्श शिक्षक व क्रीडारत्न महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे निवडपत्र प्राप्त झाले असुन लवकरच पुणे येथे सदरील पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री मनेश गोरे सर यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मान होणार असल्याचे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे .
सदरील पुरस्कार जाहीर झाल्याचे वृत्त कळताच गोरे सरांचे हितचिंतक मित्र सहकारी तथा नातेवाईक कौटुंबिक यांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .