श्री संस्कार इंग्लिश स्कूल मध्ये हळदी कुंकुवाचा कार्यक्रम व खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न
शैक्षणिक सामाजिक विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री संस्कार इंग्लिश स्कूलच्या वतीने रविवारी दुपारी पंचक्रोशीतील महिलांचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.
याविषयी सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील लवकरच नावारूपाला आलेल्या श्री संस्कार इंग्लिश स्कूल च्यावतीने विद्यार्थ्यांच्या महिला पालकांचा व पंचक्रोशीतील महिलांचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. मनिषाताई कुपकर, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी शिवसंग्राम बीड या होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून सरपंच मा. सौ रोहिणीताई देशमुख, ह.भ.प.शारदाताई गालफाडे, सौ .छाया साखरे, सौ.सखुबाई सपाटे, सौ.सुदामती गलांडे या होत्या.
यावेळी सर्वप्रथम माता जिजाबाई, स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. व महिलांचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम घेण्यात आला व नंतर महिलांच्या संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात, बकेट बॉल, स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये अनुक्रमे सौ. अपेक्षा अभिजित राऊत, सौ.सोनाली महादेव गलांडे, सौ.अमृता रणजित राऊत विजेत्या ठरल्या त्यांचा श्री संस्कार इंग्लिश स्कूलच्या वतीने पैठणी बक्षीस देऊन सौ. मनिषाताई कुपकर, व प्रमुख पाहुण्या व शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षीकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना शिवसंग्राम महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ मनिषाताई कुपकर यांनी मुलींना उच्च शिक्षण शिकवा, तसेच अल्प वयात मुलींचा विवाह करू नका व मुलींना सक्षम बनवा असा मोलाचा सल्ला दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलम जोगदंड यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका सीमा काळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सीमा काळे शिक्षीका देशमुख मॅडम, रेश्मा गायकवाड, सोनाली खंदारे, निलम जोगदंड, प्रियंका शिंदे, पुनम चंदनशिव यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.