संभाजी ब्रिगेडच्या “महात्मा ज्योतिबा फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक” पुरस्कारांचे 14 जानेवारी रोजी अंबाजोगाईत वितरण
सामाजिक शैक्षणिक विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण रविवार, दि.14 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता अंबाजोगाईत करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात महत्वपुर्ण योगदान देणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा प्रवर्तनवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते बाबासाहेब धन्वे (अंबाजोगाई) आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिका मंजुषा माणिकराव शिंदे (परळी) यांचा पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये समावेश आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन हा शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा व्हावा ही तमाम बहुजन समाजातील संघटनांची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्याची दखल घेऊन मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने मागील 11 वर्षांपासून अंबाजोगाई शहरात महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. यावर्षी ही या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के (बीड) तर यावेळी विचारमंचावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जगद्गुरू संत तुकोबाराय साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर वराट गुरूजी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे, मराठा सेवा संघ प्रणित न्याय कक्षाचे जिल्हाध्यक्ष एॅड.प्रशांत शिंदे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. प्रवर्तनवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते बाबासाहेब धन्वे यांनी अंबाजोगाई तालुक्यातील जयभवानी विद्यालय, लोखंडी सावरगाव येथे मुख्याध्यापक म्हणून शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात ही महत्वपुर्ण योगदान दिले आहे. तसेच सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंजेगाव (केंद्र बेलंबा) ता.परळी, जि.बीड येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या मंजुषा माणिकराव शिंदे (परळी) या ही शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात आपले महत्वपुर्ण योगदान देत आहेत. या दोन्ही मान्यवरांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन समितीने सदरील पुरस्कारांसाठी निवड केली आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, ग्रंथ, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ असे आहे. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड अंबाजोगाई यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण रविवार, दि.14 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता विठाई मुलींचे वसतीगृह, स्वामी रामानंद तीर्थ आणि योगेश्वरी महाविद्यालयाच्या समोर, भाग्यलक्ष्मी निवास, परळी रोड, अंबाजोगाई येथे करण्यात येणार आहे. अशी माहिती आयोजक संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे (8999062707), मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के (9422930017) आणि दयानंद देशमुख (9766937757) यांनी संयुक्तरित्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.