ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन, वरद हाइट्स अंबाजोगाई संस्थेस राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्कार प्रदान

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सेवा सहयोग फाउंडेशन व ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यामाने मागील दोन वर्षात जवळपास दहा लाख रुपयांची शैक्षणिक सहाय्य योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची फीस भरण्यात आली. ग्रामीण भागातील शाळेपासून दोन किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत 40 सायकलींचे वाटप करण्यात आले. कोविड कालावधीमध्ये अडीचशे रेशन किट वाटप, 15000 एन 95 मास्कचे मोफत वाटप, आय आय टीचे क्लास करणाऱ्या गरजू व गरीब विद्यार्थ्यांना प्रत्येकी 20000 रुपये किमतीची पुस्तके मोफत वाटप. तसेच शैक्षणिक व सामाजिक, वृद्ध सेवा, वृक्षारोपण, कौशल्य विकास आदी क्षेत्रातील अनमोल अशा कार्याबद्दल परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग जिल्हा धाराशिव व संविधान सन्मान परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत यावर्षीचा राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्कार व सन्मानपत्र देऊन ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाई या संस्थेस ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांच्या हस्ते आपलं घर प्रकल्प आलियाबाद नळदुर्ग येथे सन्मानित करण्यात आले. सदरील पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष ज्योतीराम सोनके व उपाध्यक्ष दत्तात्रय पवार, संस्थेचे सचिव प्राध्यापक भागवत गोरे, संचालक चंद्रकांत वाघमारे, धनंजय डोळस यांनी स्वीकारला. याप्रसंगी राजर्षी शाहू महाविद्यालय लातूरचे माजी प्राचार्य तसेच ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुरेश वाघमारे, डॉ. मिलिंद वाकोडे सेवानिवृत्त कार्यकारी अधिकारी खादी ग्रामोद्योग भारत सरकार, प्रा. राजा सोनकांबळे एस एन डी टी महिला कॉलेज पुणे, डॉ.ज्ञानोबा जाधव माजी उपप्राचार्य शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब, एडवोकेट मैना भोसले सदस्य महाराष्ट्र राज्य बाल कल्याण समिती धाराशिव, संयोजक मारुती बनसोडे सचिव परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग,शिक्षक भारती शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे, यांची व्यासपीठावरती उपस्थिती होती.