आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनसांस्कृतिक

नवकेशर नृत्य महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमीने नवप्रतिभांना मिळवून दिले सशक्त व्यासपीठ_

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी येथील नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमीने नेहमीप्रमाणेच पुढाकार घेत भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अंबाजोगाईत नवकेशर नृत्य महोत्सवाअंतर्गत वैयक्तिक व समुहनृत्य, गायन स्पर्धांचे आयोजन केले होते. विविध वयोगटातील ५७० स्पर्धकांनी या स्पर्धेस उत्स्फूर्त दिला. तर उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

 

बक्षीस वितरण समारंभास प्रमुख अतिथी म्हणून दीनदयाळ बँकेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान संचालिका सौ.शरयूताई हेबाळकर, सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव लांडे, उद्योजक सुरेशराव मोदी, उद्योजक मोईन शेख, आयोजक भिमाशंकर शिंदे व प्रा.आरती भिमाशंकर शिंदे या मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावर्षी पासून प्रथमच भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मंगळवार, दिनांक २८ जानेवारी रोजी आद्यकवि मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह, अंबाजोगाई या ठिकाणी नवकेशर नृत्य महोत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे आहेत. वैयक्तिक नृत्य गट – इयत्ता १ ली ते ४ थी मानवी पतंगे (प्रथम), रूही बडे (द्वितीय), मधुरा चिंचोलकर (तृतीय) तर समृध्दी काकडे व संध्या मुजमुले (उत्तेजनार्थ) आणि वैयक्तिक नृत्य गट – इयत्ता ५ वी ते १० वी स्वरनिका वांजरखेडकर (प्रथम), वसुंधरा काशीद (द्वितीय), गीता उकरे (तृतीय), अन्वी रांदड व विराज वागडोळे (उत्तेजनार्थ) तसेच वैयक्तिक नृत्य गट – खुला अश्विनी यादव (प्रथम), अश्विनी शिंदे (द्वितीय). समूह नृत्य गट – इयत्ता १ ली ते ४ थी प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कूल, अंबाजोगाई (प्रथम), स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिर, अंबाजोगाई (द्वितीय), घाटनागनाथ प्राथमिक विद्यालय, अंबाजोगाई (तृतीय) तर उत्तेजनार्थ पारितोषिक – १) कै.वसंतराव काळे पब्लिक स्कूल आणि २) सृजन प्राथमिक विद्यालय, चनई यांना देण्यात आले. समूह नृत्य गट – इयत्ता ५ वी ते १० वी स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिर, अंबाजोगाई (प्रथम), प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कूल, अंबाजोगाई (द्वितीय), सृजन प्राथमिक विद्यालय, चनई (तृतीय) आणि उत्तेजनार्थ पारितोषिक १) जोधाप्रसादजी मोदी विद्यालय व २) मुक्तांगण विद्यालय यांनी पटकाविले. समुह नृत्य गट खुला – प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कूल, अंबाजोगाई (प्रथम) तर समुह नृत्य गट – दिव्यांग – मानव विकास मूकबधीर विद्यालय अंबाजोगाई (प्रथम), बाबासाहेब परांजपे दिव्यांग विद्यालय अंबाजोगाई (द्वितीय), कर्तव्य मतिमंद मुलींचे निवासी विद्यालय, अंबाजोगाई (तृतीय) तर उत्तेजनार्थ पारितोषिक – १) सेवा मतिमंद मुलांची शेतकी कार्यशाळा, धानोरा, २) ज्ञानसागर कर्णबधिर निवासी विद्यालय, भारज पाटी या संघांनी पटकाविले. नवकेशर गीत गायन स्पर्धेत नंदिनी कुलकर्णी (प्रथम), अश्विनी सौंदळे (द्वितीय), गिता देशमुख (तृतीय) तर आत्मजा परतवाडे आणि सोहम सचिन मोरे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले. हे या स्पर्धेचे पहिले वर्ष होते. या स्पर्धा ४ गटांत उत्कृष्टरित्या आयोजित करण्यात आल्या होत्या. नृत्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नृत्य परिक्षक कपिल भरणे (परभणी) आणि आशिष झाडके (धाराशिव) यांनी परिक्षण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिमाशंकर शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा.अनंत कांबळे व गणेश तौर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा.आरती भिमाशंकर शिंदे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी आयोजक भिमाशंकर शिंदे, संयोजन समितीचे प्रा.अनंत कांबळे, गणेश तौर, सुशिल कुंबेफळकर, विक्रमसेन आगळे, सुनिल व्यवहारे, बळीराम उपाडे, बाळासाहेब वरणे, गोविंद जगधने, प्रविण जोगदंड यांच्यासह नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमी, अंबाजोगाई यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. भव्य वैयक्तिक व समुहनृत्य, गायन स्पर्धेत अंबाजोगाई शहर व परिसरातील अनेक शाळांतील एकूण ५७० विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पारीतोषिक वितरण सोहळ्यापूर्वी विजेत्या स्पर्धक व सहभागी संघांनी राष्ट्रभक्तीपर गीत, गोंधळ, भारूड, पोवाडा, बॉलिवूड, सेमी क्लासिकल, वेस्टर्न, हिप हॉप, शेतकरी गीत, आदिवासी नृत्य, गुजराती नृत्य, पारंपारिक लावणीचे अप्रतिम वैयक्तिक व समुह नृत्याविष्कार सादर करून, गीत गायन करून उपस्थितांची मने जिंकली.

 

*अंबाजोगाईचा सांस्कृतिक वारसा जोपासण्याचा प्रयत्न :*

शहरात मागील १७ वर्षांपासून नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमीच्या वतीने अंबाजोगाईचा सांस्कृतिक वसा आणि वारसा जोपासत आहोत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्यपूर्ण विधायक प्रयत्न करण्यात येत आहेत. अकॅडमीच्या अनेक विद्यार्थ्यांनी विश्व, देश, राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुकास्तरीय विविध वैयक्तिक व समुह नृत्य स्पर्धांच्या माध्यमातून सहभागी होवून उज्ज्वल यश संपादन करीत अंबाजोगाईचे नांव‌ उंचावले आहे. लवकरच माता श्री योगेश्वरी देवीचा महिमा सांगणारे मराठी गीत व व्हिडिओ अल्बम निर्मिती करणार आहोत. यापुढील काळातही नृत्य क्षेत्रात नवप्रतिभांना योग्य संधी उपलब्ध व्हावी यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून नवे व्यासपीठ आणि मंच उपलब्ध करून दिला आहे.

 

*- भिमाशंकर शिंदे*

– (संचालक, नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमी, अंबाजोगाई.)

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.