साखर कारखानदाराच्या तोडीस तोड ऊसाला भाव देणार -विक्रम (बप्पा) मुंडे
रेणूका ॲग्रो इंडस्ट्रीजच्या ५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज ! प्रतिनिधी (महादेव दौंड)
*रेणूका ॲग्रो इंडस्ट्रीज गुळ उद्योग आसून सध्या बाजारपेठेत गूळाला योग्य भाव नसल्याने उद्योग अडचणीत आला आहे.तरी सुद्धा साखर कारखानदाराच्या तोडीस तोड ऊसाला भाव देणार असल्याचे प्रतिपादन माजी जि.प.उपाध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे यांनी केले आहे.*
*रेणुका ॲग्रो इंडस्ट्रीज (गुळ उद्योग) (आंबळाचे बरड) च्या ५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरूवार दि-२/११/२०२३ रोजी बीड जिल्हा परिषेदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे यांच्या अध्येक्षतेखाली तर जिल्हा कृषी अधिकारी बी.के.जेजूरकर व बप्पासाहेब घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी ह.भ.प.रतन महाराज सासुरेकर,ह.भ.प.श्रीराम महाराज विडेकर,ह.भ.प.लाड महाराज बरडकर,ह.भ.प.गणेश महाराज मुंडे यांनी उपस्थित राहून उद्योगास शुभेच्छा दिल्या.यावेळी भाजपाचे जि.उपाध्यक्ष सुनिल गलांडे,जेष्ठ नेते सखाहरी (तात्या) गदळे,मुरलिधर (बप्पा) ढाकणे,बिभिषण पाळवदे,दहिफळचे सरपंच डॉ.शशिकांतजी दहिफळकर,एकुरक्याचे सरपंच प्रशांत केदार,माजी सरपंच डाॅ.श्रीहरी धस,राजेभाऊ हाराळे,महादेव जाधवर,देवगावचे उपसरपंच सुभाष मुंडे,माजी उपसरपंच विठ्ठल मुंडे,केंद्रप्रमुख शंकर मुंडे सर,डी.एल.बापू नागरगोजे,पी.एस.नाना नागरगोजे,डी.डी.जोगदंड,पी.डी.मुरकुटे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुशराव कलाणे,से.स.सोसायटीचे चेअरमण बळीराम चाळक,डॉ.धनराज पवार,ॠषीकेश (भैय्या)पटाईत,किशोर फड,किशोर देशमुख,चंद्रकांत कुलकर्णी,विशाल केंद्रे,रामभाऊ मुंडे,लिंबराज ढेंगे,विठ्ठल भोसले,बारीक भोसले यांच्यासह या भागातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान जि.प.सदस्य विजयकांत (भैय्या) मुंडे,अतुल (दादा) मुंडे,प्रा.माधूरीताई मुंडे रूपालीताई मुंडे,सुनिता पवार,कांचण कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान केला.यावेळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.*