अपयश तात्पुरते असते, त्याला घाबरू नका – विश्वास पाठकांचा युवकांना सल्ला
महाविद्यालयीन जीवनात सुसंगत अत्यंत महत्वाची - नवनाथ बन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
संघ विचार परिवाराच्या कुळातून शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या यशाची उज्ज्वल परंपरा असून संस्थेची शतकाकडे वाटचाल खुप मोठा टप्पा म्हणावा लागेल. त्यासाठी त्याग, तपश्चर्या तितकीच महत्वाची असुन ज्या संस्थेने स्व.प्रमोदजी महाजन, स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे कार्यकर्तृत्व घडविले, तिथे येण्याचे भाग्य मला मिळाले हे माझे नशीब. परिस्थिती कशीही आली तरी प्रामाणिकपणे काम केले तर निश्चित यश मिळते, अपयशाला घाबरू नका कारण ते तात्पुरते असते असा मौलिक युवकांना सल्ला महावितरण स्वतंत्र संचालक तथा भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी दिला. दरम्यान महाविद्यालयीन जीवनात सुसंगत कुणाची ? यावर आपले करिअर घडते. राष्ट्र विचाराने प्रेरित असलेल्या संस्थेतून व्यक्तीमत्व विकास झाल्याशिवाय रहात नाही. माझ्या जीवनात या संस्थेचे अत्यंत महत्वाचे स्थान असल्याचे प्रतिपादन भाजपा माध्यम विभागाचे प्रदेश प्रमुख नवनाथ बन यांनी केले.
या कार्यक्रमास केज विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार मुंदडा यांनी स्नेह संमेलन हा विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा दिवस असून विविध स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्तीमत्वाचा विकास होतो. भारतीय शिक्षण प्रसारक ही संस्था माझी असल्याने आपलेपणाचे नातं वेगळंच असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर होते. संस्थेच्या येथील खोलेश्वर महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर बोलत होते. व्यासपीठावर संस्था कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत मुळे, डॉ.कल्पनाताई चौसाळकर, किरण दादा कोदरकर, अविनाश तळणीकर, वर्षाताई मुंडे, आप्पाराव यादव, ऍड.शरद इंगळे, खो-खो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथम आलेल्या कु.प्रियंका इंगळे यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांच्या शुभ हस्ते दिप प्रज्ज्वलन झाल्यानंतर उपस्थित अतिथींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातुन महाविद्यालयाची ओळख प्राचार्या डॉ.प्रिती पोहेकर यांनी करून दिली. संस्थेच्या वतीने कु.इंगळे हिचा सन्मान करण्यात आला.आपल्या भाषणात विश्वास पाठकांनी संस्थेच्या यशाचे कौतुक करताना कोणतीही संस्था तपश्चर्यानेच प्रगतीच्या दिशेने चालते. २०४७ पर्यंत भारत हा विश्वगुरू होईल. त्यासाठी अशा संस्थेची अत्यंत भुमिका महत्वाची वाटते. कारण, एक चांगला भारतीय नागरिक माध्यमांतुन घडविल्या जातो. जीवनात एखादी संधी मिळाली तर आपल्याच कामातुन त्या संधीचा आनंद घेता येतो. मात्र प्रामाणिक हा सद्गुण टिकण्यासाठी त्यागाने काम करावे लागते. कठोर परिश्रम त्याचबरोबर विनम्रता हा खर्या अर्थाने अलंकार आनंदी जीवनाचे रहस्य असल्याने संकटं कितीही आले तरी परिस्थितीवर मात करू शकतो. तुम्ही अपयशाला घाबरू नका. कारण, तात्पुरते अपयश असते. त्यामागे छान यश दडलेले असुन जिद्द, चिकाटी आणि आपल्या भविष्यासाठी अध्ययन महत्वाचे त्यासाठी काम करावे लागणार. यावेळी त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर्तृत्वाचे उदाहरण दिले. वयाच्या तीस वर्षांपर्यंत करिअरवर फोकस मुला-मुलींनी केले तर जीवनात आपण काहीतरी मिळाल्याशिवाय राहू शकत नाहीत हा सल्ला त्यांनी दिला. आणि कार्यक्रमात नवनाथ बन यांनी प्रभावीपणे विचार व्यक्त केले. स्नेह संमेलन सर्वांत मोठा उत्सव असुन खोलेश्वर सारख्या राष्ट्र विचाराने प्रेरित महाविद्यालयात तुमचे शिक्षण होते हेच खरे भाग्य. संस्थेला राष्ट्र विचाराची परंपरा असुन तुम्ही चांगल्या सद्गुणांचे पाईक त्यामुळे भविष्य उज्वल निश्चित होणार. आयुष्याचे मैदान गाजवायचे असेल तर सुसंगत चांगली ठेवा हा महत्वाचा सल्ला त्यांनी दिला. अध्यक्षीय समारोप करताना डॉ.सुरेंद्र आलुरकर यांनी आपल्या संस्थेला पंच्चाहत्तर वर्षे होवुन गेले. शतकाकडे वाटचाल करताना राष्ट्रहित हिच भावना रूजविण्याचा आमचा प्रयत्न विकसित भारतासाठी महत्वाचा राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. आदर्श शिक्षक कसा असावा याचे उदाहरण देखील त्यांनी दिले. यावेळी कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, राम कुलकर्णी यांची समायोचित भाषणे झाली. सुत्रसंचालन कु.पुजा शिंदे, धनश्री यादव, प्रा.तृप्ती आडेकर, प्रा.मृणाल गोरे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य प्रा.बिभीषण फड यांनी मानले. प्रा.शैलेष पुराणिक यांनी वैयक्तिक पद्य सादर केले.