चाईल्ड प्रायमरी स्कूल केज येथे खो-खो महिला विश्वकप विजेत्या भारतीय संघाच्या कर्णधार प्रियंका इंगळे यांचा भव्य सत्कार
सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान विजयाचा , सन्मान भुमिपुत्र कन्येचा .

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज प्रतिनिधी
खो-खो महिला विश्वकप विजेत्या भारतीय संघाच्या कर्णधार प्रियंका इंगळे चे आज केज येथील चाईल्ड प्रायमरी स्कूल, केज येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले .
याबाबत सविस्तर माहीती अशी की,केज परिसरातील कळमआंबा येथील कु.प्रियंका इंगळे हिच्या नेतृत्वाखालील महिलांच्या भारतीय खो-खो संघाने, दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर पार पडलेल्या विश्वकप स्पर्धेत अंतिम सामन्यात नेपाळ संघावर मात करत विश्वकप जिंकला. त्यामुळे या आपल्या भागातील कळमआंबा येथील प्रियंका इंगळे या लेकीचा स्वराज्य संस्था संचलित चाईल्ड प्रायमरी स्कूल केज व ग्रामस्थांच्या वतीने दि.०८ शनिवार सकाळी १० वाजता भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ.हनुमंत सौदागर हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नागेशजी कराळे, प्रियांका चे आई वडिल आजोबा व काका, तसेच पत्रकार रंजीत घाडगे, शेखर पाटील, प्रकाश काळे, सचिन बचुटे,प्रदिप गायकवाड, गणेश तपसे, हरिश्चंद्र पांचाळ, शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड,उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. शरदजी गिराम यांनी केले होते. सत्कार करताना हार,पुष्प गुच्छ, शाल, श्रीफळ, व ट्रॉफी मिळालेली प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी संस्थेचे सर्व कर्मचारी,पत्रकार,ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश काळे यांनी केले तर आभार शरद गिराम यांनी व्यक्त केले.