सोनेसांगवी ग्रामपंचायत राबवणार आदर्श उपक्रम जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे होणार मुदत ठेव. – सरपंच मुकुंद कणसे
गावातील इय्यता 10 वी व 12 वीत प्रथम येणाऱ्या मुलामुलींच्या हस्ते15 आगस्ट स्वातंत्र्य दिनाचे होणार झेंडा वंदन

सोनेसांगवी ग्रामपंचायतचा आदर्श उपक्रम जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे होणार मुदत ठेव. – सरपंच मुकुंद कणसे
गावातील इय्यता 10 वी व 12 वीत प्रथम येणाऱ्या मुलामुलींच्या हस्ते15 आगस्ट स्वातंत्र्य दिनाचे होणार झेंडा वंदन
______________________
केज प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे. सोनेसांगवी ग्रामपंचायत आयोजित 15 ऑगस्ट भारतीय स्वतंत्रता दिवस व मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायतने गावात मुलींचा जन्मदर वाढावा तसेच जिजाऊ , सावित्रीचा वसा व वारसा कायम राहावा यासाठी मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणुन जन्मालेल्या मुलीच्या नावे 5501 रुपया आर्थिक ठेव योजना सुरू करण्यात येणार आहे व गावातील वर्ग 10 वी व वर्ग 12 वी इय्यतेत गुणवत्तेत प्रथम क्रमांक आलेल्या मुलाच्या किंवा मुलीच्या हस्ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात येणार असल्याचे निश्चित केले असुन सदरील समाजाला दिशा देणारा आगळावेगळा उपक्रम राबविण्याचा निर्णय मौजे सामाजिक , राजकीय क्षेत्रात नाव असलेले सोनेसांगवी गावचे भुमिपुत्र सरपंच मुकुंद कणसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या 25/8/2023 च्या ग्रामसभेत सर्वानुमते ठरावा पारित करून निर्णय घेण्यात आला . यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन गावचे ग्रामसेवक , उपसरपंच डिकले राहुल , ग्रा.सदस्य पांचाळ शामल , साखरे सिध्देश्वर, शेख बबर , राऊत मिना , गालफाडे संगीत , यादव कमल या सदस्यांच्या उपस्थितीत वरील निर्णय घेण्यात आला असुन याप्रसंगी उपस्थित सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनेचे स्वागत करण्यात आले .
मुलीच्या जन्माचे स्वागत करणार सामाजिक उपक्रम
मुलीच्या नावे आर्थिक ठेव योजना राबविण्याचा निर्णय घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरातून होत असुन सरपंच मुकुंद कणसे यांनी मुलीच्या जन्माचे स्वागत घेणार निर्णय अनेकांना प्रेरणा देणारा असणारा आहे केज तालुक्यातील सोनेसांगवी गावने आपला आदर्श निर्माण केला आहे .