आवसगाव येथे श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार भव्य दिव्य 1 कोटी 11 लक्ष रुपयाचे साकारले विलोभनीय मंदिर, उद्या श्रीराम नवमी सोहळा होणार साजरा.
श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे गावकऱ्यांचे आवाहन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड/ केज तालुक्यातील मौजे आवसगाव येथे मागील जवळपास दोनशे वर्षाची परंपरा असलेले प्रभु श्रीरामाचे मंदिर असुन मागील दोन वर्षांपूर्वी सदरील मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प मौजे आवसगावच्या सर्व समाज बांधवांनी करुन यासाठी येणाऱ्या आर्थिक मदतीसाठी गावातील शेतकरी, कष्टकरी , शासकीय निमशासकीय नौकरदार , व्यावसायिक , तसेच आपल्या गावापासून कोसो दूर असलेल्या भुमिपुत्रांनीही सढळ हाताने मदत करून मंदिर पुनर्निर्माण सुरू केले बघता बघता मंदिराचा कायापालट करण्याचा संकल्प केलेल्या गावकऱ्यांनी अहोरात्र मेहनत करत काम वेगाने सुरू ठेवले आणि याच गावकऱ्यांच्या संकल्पाला केज विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या माध्यमातूनही भरीव तरतूद करुन मंदिराच्या शेजारच्या रिक्त जागेवर सभामंडप पुर्णत्वास आला असुन या सर्व रामभक्तांच्या सहकार्याने मौजे आवसगावच्या वैभवात भर टाकणारे साक्षात प्रभु श्रीरामाचे भव्य दिव्य असे राममंदिर तयार झाले असुन मंदिर परिसरात अतिशय विलोभनीय दृश्य पाहून मन प्रसन्न होते मंदिरात प्रवेश करताचा मनाला वेधून घेणारा सभा मंडप तसेच मंदिरातील गाभाऱ्यात असलेल्या श्रीराम ,सितामाई , लक्ष्मण, हनुमानजी , श्री रामदासीबुवा महाराज यांची समाधी , विठ्ठल रखुमाई मुर्ती येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेतात .
आवसगाव येथे संपन्न होत असलेल्या श्री राम जन्म सोहळ्यास उपस्थित राहाण्याचे आवहान.
रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी मौजे आवसगाव येथे भव्य दिव्य स्वरुपात श्रीराम नवमी सोहळा साजरा होणारा असुन महाराष्ट्रातील तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे व प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी उपस्थित राहाण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळ आवसगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे .
श्रीराम नवमी जन्मोत्सव – 2025 सोहळ्यानिमित्त मौजे आवसगाव नगरीत सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत ….!!!!