आपला जिल्हाराजकीयवैभवशाली महाराष्ट्र न्युज

खासदारांनी घेतली सलग तीन तास रेल्वेची मॅरेथॅान बैठक

बीड-नगर-मुंबई रेल्वे सुरु करण्याचे दिले निर्देश

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

बीड जिल्हा प्रतिनिधी

बीड: अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम या पूर्वीच्या बैठकांमधे निश्चित करुन देण्यात आलेल्या वेळेत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत असतानाच कामाची गती मंदावू देऊ नका. बीड ते परळी रेलमार्गासाठी बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांना भुसंपादनाचा मावेजा देताना काटकसर करु नका. भुसंपादनाची उर्वरित प्रकरणे तातडीने मार्गी लावा. विद्युतीकरणाच्या कामात येत असलेले अडथळ्यांवर मार्ग काढीत असताना रेल्वे क्रॉसिंगची काही कामे अर्धवट असून ती तातडीने पुर्ण करा. रेल्वेमार्गास विद्युत जोडणीच्या कामाला गती द्या, अशा सुचना खा.बजरंग सोनवणे यांनी केल्या.

दि.११ एप्रील रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता रेल्वे विभागाच्या बैठकीला सुरूवात झाली. बैठकीस जिल्हाधिकारी अविनाश पाठक, मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता लोळगे तसेच पाटोदा, बीड, माजलगाव महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, भूसंपादन अधिकारी, महावितरण विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, आहिल्यानगर आणि नांदेड रेल्वेचे मुकुंद नाईक, एम सुरेश, निगम, एस.आर.कुवर, संजय श्रीवास्तव, यादव, एस.के.मंडल, मानसिंग हे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी खा.बजरंग सोनवणे यांनी अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाला विद्युत जोडणीच्या कामाची सद्यस्थिती, आष्टी येथील स्थानकास विद्युत जोडणी देणेबाबतच्या कामाची सद्यस्थिती तसेच बीड ते वडवणी बीटमधील विद्युतलाईनचे कामाची स्थिती. वडवणी ते सिरसाळा बिट कामाची सद्यस्थिती याबाबत सविस्तर आढावा घेतला. सुकळी, खामगाव व तपोवन या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वेमार्गामधे प्रस्तावित करायच्या अतिरिक्त उपाययोजना, सिरसाळा ते परळी कामाची सद्यस्थिती. परळी-परभणी डबल लाईन कामामुळे बाधित होत असलेल्या (परळी)आजादनगर येथील नागरिकांवर कसलाही अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन सदरील काम तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बीड- नगर-मुंबई व बीड-नगर-पुणे इंटरसिटी सेवा चालू करणेसाठी करावयाच्या कामांबद्दल सुचना दिल्या.

००

रायमोह, धनगरवाडी यासह अनेक भागातील शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीचा मावेजा बाबत निर्देश दिले.

००

अधिकाऱ्यांचे आभार अन् अभिनंदन

दि.१८ जून २४ च्या रेल्वे प्रकल्प बैठकीमधे ठरल्यानुसार आहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्ग प्रकल्पातील बीडपर्यंतचे काम व गती चाचणी वेळेत पूर्ण केल्याबद्दल खा.बजरंग सोनवणे यांनी रेल्वे विभागाचे सर्व अधिकारी, भुसंपादनाशी संबंधित महसूल विभागाचे अधिकारी व विद्युत विभागाचे संबंधित अधिकारी या सर्वांचे आभार मानत अभिनंदन केले.

००

या कामांचे मागविले प्रस्ताव

आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी, कडा तसेच पाटोदा तालुक्यातील गांधनवाडी, कारेगाव आणि शिरुर तालुक्यातील गोमळवाडा, विघनवाडी, हिवरसिंगा, घुगेवाडी/बरगवाडी आणि बीड तालुक्यामधे नवगण राजुरी, च-हाटा, धानोरा रोड या सर्व ठिकाणी रेल ओव्हर ब्रिज व बीड शहरालगत ढोलेवस्ती येथे रेल अंडरपास बांधण्याचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या. मुंबई येथील मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांचेशी प्रस्ताव व निधी मंजुरीबाबत चर्चा केली.

००

 

धाराशिव-बीड-छ.संभाजीनगर या नवीन रेल्वेमार्गाच्या सर्व्हेक्षणास गती देण्याबाबत संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.

बार्शीनाका (इमामपूर) येथे अतिरिक्त रेल्वे थांबा देणे, नगर-बीड-परळी रेल मार्गावरील सर्व प्रमुख स्थानकाना लागणारी वीज उपलब्ध करणेसाठी स्थानकांवर सोलार उर्जा निर्मिती प्रकल्प तयार करावेत. यासाठी आवश्यक निधीच्या मागणीसह स्वतंत्र प्रस्ताव जनरल मॅनेजर यांचे कार्यालयास सादर करावेत अशा सूचना देण्यात आल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.