सैनिकाचा एक मॅसेज अन् खा.सोनवणेंनी केली ट्रेनच्य बुकींगसाठी मदत
कुटूंबासाठी मिळत नव्हते ट्रेनचे बुकींग, खासदाराच्या कोट्यातून उपलब्ध केले सीट

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
बीड: भारताने पाकिस्थानविरूध्द ऑपेरशन सिंदूर सुरू केल्यानंतर भारतीय सैन्य रात्रंदिवस कामाला लागले. अशावेळी आपले कुटूंब गावी पाठविलेले बरे म्हणून एका सैनिकाने ट्रेनचे बुकींग करण्याचे प्रयत्न केले. परंतु तिकीट मिळत नव्हते. यानंतर सैनिकाने बीडचे खा.बजरंग सोनवणे यांना एक मॅसेज केला. यानंतर अवघ्या तिस सेकंदात सोनवणेंनी परत फोन करून समस्या एैकून घेतली आणि तातडीने रेल्वेबोर्डला पत्र लिहून स्वतच्या कोट्यातील आरक्षीत सीट सैनिकाच्या कुटूंबियासाठी उपलब्ध करून दिली.
पहेलगम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने या दहशतवादी हल्ल्या बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. यानंतर देशाच्या सिमेवर तणाव निर्माण झाला. अमृतसर येथे अंबाजोगाई तालुक्यातील बाबळगाव येथील विशाल हनंमतराव करपे पाटील हे सैन्यात काम करत आहेत. अमृतसर येथेही ड्रोनहल्ले करण्यात आले. अशावेळी आपले कुटूंब गावी पाठवावे, असा निर्णय सैनिक असलेले विशाल करपे यांनी घेतला. यानंतर दि.९ रोजी त्यांनी ट्रेन बुकींगसाठी प्रयत्न केले. परंतु सर्वत्र गोंधळाची स्थिती असल्याने ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या वाढली. परिणामी, तिकीटाचे बुकींग मिळत नव्हते. दोन दिवस प्रयत्न करूनही तिकीट बुकींग होत नाही, हे लक्षात आल्यानंतर करपे यांनी बीडचे खा.बजरंग सोनवणे यांना तिकीट बुकींग करण्याबाबत काही मदत होईल का, या भावनेने दि.१० रोजी मॅसेज केले. मॅसेजनंतर अवघ्या तीस सेकंदात खा.सोनवणे यांनी करपे यांनी कॉल करून काय मदत करावी, असे म्हणत त्यांचे म्हणणे एैकूण घेतले. यानंतर तातडीने रेल्वेबोर्डला लिहले. सदरील पत्र रेल्वेविभागाचे विभागीय कार्यालय,फैजपुर येथे पाठविण्यात आले. यानंतर तातडीने त्यांना दि.११ मे रोजीची बुकींग मिळाली. दि.११ रोजी सकाळी करपे यांच्या पत्नी, दोन मुले ट्रेममध्ये बसवून गावी पाठविण्यात आले. यावेळी विशाल करपे यांनी सैनिकाच्या मदतीला खासदार आले, याबाबत आभार मानले.
००
भारताच्या रक्षणासाठी आपले सैनिक जिवाची बाजी लावून सिमेवर लढत आहेत. विशाल करपे यांनी रेल्वे बुकींगच्या बाबतीत मॅसेज केला. यानंतर मी तातडीने शक्य ते केले. आपले पत्र सैनिकाच्या कामी यावे, यापेक्षा मोठा काय आनंद असू शकतो. त्यांची सेवा करणे आपले कर्तव्य असून मी कर्तव्य भावनेतून काम करत आहे.
-बजरंग सोनवणे, खासदार, बीड.
००
अमृतसर येथून ट्रेनचे बुकींग मिळत नव्हते. इकडे तणाव असल्याने कुटूंब सुखरूप गावी पाठविणे आवश्यक होते. यामुळे मी खा.बजरंग सोनवणे यांना मॅसेज केला. त्यांनी फोन करून आपुलकीने विचारपूस करत तातडीने पत्र देऊन मला मदत केली. यामुळे खून आनंद वाटत आहे.
-विशाल करपे, भारतीय सैनिक.