अंबाजोगाई नगरपरीषदेवर शहर विकास संघर्ष समितीचा मोर्चा धडकला
नागरी सुविधा व इतर गंभीर समस्यांकडे निवेदनातून लक्ष वेधले

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
नागरी सुविधा, घरकुले, भोगवटा मालमत्ता मालकी हक्कांत घेणे व इतर गंभीर समस्यांची सोडवणूक करा यासह एकूण सहा मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना देत शहर विकास संघर्ष समितीचा मोर्चा शुक्रवारी अंबाजोगाई नगरपरीषदेवर धडकला.
शहर विकास संघर्ष समितीच्या वतीने नागरी सुविधा, घरकुले, भोगवटा मालमत्ता मालकी हक्कांत घेणे व इतर गंभीर समस्यांची सोडवणूक करा यासह एकूण सहा मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना शुक्रवार, दिनांक २७ जुन रोजी देण्यात आले. सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या शहरात निवारा व भोगवटा मालकी हक्क या बाबत अनेक वर्षांपासून जनता आंदोलन करीत आहे, हे प्रश्न अद्याप ही कायमचे सुटलेले नाहीत, नगरपरिषदची कौन्सिल नसल्याच्या कालखंडात मुख्याधिकारी यांच्या नियंत्रणात शहरात अनेक कामे जनतेच्या पैशाचा अपहार करणारी झालेली आहेत, त्याची चौकशी करणे आवश्यक आहे, आम्ही खालील मुद्यांसाठी आज आंदोलन करीत आहोत, मागण्या अशा १) सर्व झोपडपट्टी विभागात घरकुलांचा लाभ द्या, २) भोगवट्याची घरे मालकी हक्कांत घ्या, ३) शहरात न.प.ची जुनी दुकाने व्यक्तीगत मालकी हक्कांप्रमाणे नाममात्र भाड्याने दिलेली आहेत, त्या सर्व दुकानांचा लिलाव करा, दर पाच वर्षांनी व्यापारी संकुलातील दुकाने लिलावात काढा, ४) शहरातील पाणी पुरवठा सर्वांत वाईट आहे, तो नियमीत करा, ५) पावसाळ्यात स्वच्छता मोहीम कायम राबवा आणि ६) आपल्या काळात व्यापारी हेतूसाठी झालेली अतिक्रमणे ताबडतोब निष्कासीत करा या मागण्यांवर आपण येत्या आठ दिवसांत तात्काळ अंमल केला नाही. तर परत तीव्र आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी. असा इशारा शहर विकास संघर्ष समितीने दिला आहे. मुख्याधिकारी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. तर नगरपरिषदेच्या मिटींग हॉलमध्ये मुख्याधिकारी प्रियांका टोंगे व नगरपालिका अधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.बब्रुवाहन पोटभरे, भिमशक्ती संघटनेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष भिमराव सरवदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख, हमीद चौधरी, यशोधन लोमटे, लोकजनशक्ती पार्टी (रा) युवाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहुळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष असेफोद्दीन खतीब, अभिजीत लोमटे, ऍड.इस्माईल गवळी, विनोद शिंदे, बाबा शेख, प्रेम माने, मनिष आदमाने, संतोष पारधे, विशाल पोटभरे, लोकजनशक्ती पार्टी (रा) युवाचे बीड जिल्हाध्यक्ष अशोक काळे, केज तालुकाध्यक्ष गंगाधर पौळ, प्रदीप गुंडरे, दिनेश घार, अझहर शेख अकबर शेख, आदित्य चौरे, करण तेलंग, सुजित मुसळे, कैलास मस्के, सागर मिरगुडे, शुभम तरकसे, सुमित आवाडे, संकेत तरकसे, अविनाश मोरे, रोहन आवडे, धीरज आवाडे, शुभम भोसले, राम मोरे, सागर किर्दंत, चिकू जोगदंड यांच्यासह विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला.